कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:10 PM2020-01-30T22:10:48+5:302020-01-30T22:10:53+5:30

भुसावळ : येथील जळगाव रोडवरील गुरुद्वारातून घरी जात असतांना वृद्ध महिलच्या स्कुटीला जळगावकडून येणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने या महिलेचा ...

The woman was killed on the spot by the container | कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार

कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार

Next


भुसावळ : येथील जळगाव रोडवरील गुरुद्वारातून घरी जात असतांना वृद्ध महिलच्या स्कुटीला जळगावकडून येणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याची दुर्दशा व जड वाहनांची वाहतूक या अपघातास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
ही दुर्घटना ३० रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास टेक्नीकल हायस्कुलजवळ घडली. अपघातीतल मयत महिलेचे नाव सतनामकौर सतरजित छाबडा (वय ५८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) असे असून टेक्नीकल हायस्कुलजवळ त्यांच्या स्कुटीला (एमएच १९ -डीएच ८५१८) अचानक जळगावकडून येणाºया कंटेरनची (एच.आर. ३८एस ९३३३) एक बाजुने धडक बसली. डोक्यास फटका बसल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना हा अपघात घडला, असेही सांगितले जात आहे. याबाबत शहर पोलिसात गुरुविंदरसिंग मलिकसिंग छाबडा यांच्या फियारदीवरुन आरोपी कंटेनर चालक इंदरसिंग सुरेंद्रसिंग (वय ४२, रा. सलावली जि. मुदेना म.प्र) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज अंत्यसंस्कार
जिल्हा रुग्णालायात शवविच्छेदन करण्यात आले असून ३१ रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी अमेरिका येथे रहाते.

Web Title: The woman was killed on the spot by the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.