शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुकान उघडले, साफसफाई केली... घराकडे निघताना महिलेला क्रेनने चिरडले!

By सागर दुबे | Updated: March 31, 2023 15:23 IST

एमआयडीसी परिसरातील घटना ; चालक पोलिसांच्या ताब्यात.

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : नेहमीप्रमाणे सकाळी लाँड्रीचे दुकान उघडले. साफसफाई करून घराकडे पायी निघालेल्या रंजना उत्तम येसे (५३,रा. म्हाडा कॉलनी) या महिलेला मागून भरधाव आलेल्या क्रेनने चिरडल्याची घटना एमआयडीसी परिसरातील माधुरी वेअर हाऊसनजीक शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

म्हाडा कॉलनी येथे रंजना येसे या मुलगा विकास आणि सून यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मुलगा खासगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लॉंड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी त्यांनी लाँड्रीचे दुकान उघडले. त्यानंतर साफसफाई करून त्या घरी जाण्यासाठी पायी निघाल्या. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील माधुरी वेअर हाऊसजवळून जात असताना मागून भरधाव येणा-या क्रेनने (एमएच ४० पी २३०९) त्यांना जोरदार धडक दिली. त्या जमीनवर कोसळल्या आणि क्रेनचे पुढील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले...

घटनेनंतर नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेवून महिलेला वाहनातून जिल्हा रूग्णालयात हलविले. त्यानंतर क्रेन चालकाला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, रंजना येसे यांना जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. यावेळी कुटूंबियांसह नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी झाली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटूबियांच्या ताब्यात देण्यात आला.  मयत महिलेच्या पश्चात मुलगा विकास, विवाहित मुलगी, सुन आणि नात असा परिवार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव