शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात घुसून महिलेला मारहाण, टी.व्ही., खुर्च्या फेकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:00 IST

रामदास कॉलनीतील भाड्याने घेतलेले घर खाली करण्यासाठी मंगला महेश सोनवणे (४०,रा.तानाजी मालुसरे नगर) या महिलेस महिलानीच घरात घुसून मारहाण केली, त्यानंतर घरातील टी.व्ही, खुर्च्या व इतर साहित्य फेकून देत नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता तानाजी मालुसरे नगरात घडली. याप्रकरणी सरिता माळी, वंदना पाटील, रेखा पाटील, मनिषा पाटील, शोभा चौधरी व एम.पाटील यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे घर खाली करण्याचा वाद   सरिता माळीसह सहा महिलांविरुध्द गुन्हा

जळगाव : रामदास कॉलनीतील भाड्याने घेतलेले घर खाली करण्यासाठी मंगला महेश सोनवणे (४०,रा.तानाजी मालुसरे नगर) या महिलेस महिलानीच ी घरात घुसून मारहाण केली, त्यानंतर घरातील टी.व्ही, खुर्च्या व इतर साहित्य फेकून देत नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता तानाजी मालुसरे नगरात घडली. याप्रकरणी सरिता माळी, वंदना पाटील, रेखा पाटील, मनिषा पाटील, शोभा चौधरी व एम.पाटील यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश पाटील, मुलगा प्रतिक, मुलगी लतिका, बहिणाचा मुलगा सागर व त्याची पत्नी भारती असे सर्व जण शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरात टी.व्ही. बघत असताना रात्री साडे नऊ वाजता सरिता माळी या चारचाकीने तर काही महिला दुचाकीने असे १० ते १५ जण घरी आले आणि अचानक शिवीगाळ करायला लागली. तु रामानंद नगरच्या हद्दीतील घर खाली करण्याच्या वादात का पडते आहे असे म्हणत थेट मारहाण करायला सुरुवात केली. माझ्या घरात येवून मलाच दादागिरी करते का? असे म्हटले असता सोबतच्या महिलांनीही मारहाण करुन घरातील टी.व्ही., खुर्च्या व इतर साहित्य फेकून दिले. यापुढे घर खाली करण्याच्या वादात पडली तर तुला पाहून घेईन अशी धमकी दिली. यावेळी शेजारील सरला सोनवणे, आशा सोनवणे व उज्ज्वला कोळी यांनी वाद सोडविला.नातेवाईकाच्या घरातील ‘सीसीटीव्ही’ची वायर कापलीमंगला सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामदास कॉलनीत गुळवे नामक महिलेच्या घरात दोन वर्षापासून भाड्याने वास्तव्याला आहेत. या घरात सरिता माळी यांना त्यांचे कार्यालय सुरु करावयचे आहे. हे घर खाली करावे म्हणून त्यांनी नातेवाईकांना त्रास देणे सुरु केले आहे. रामानंद नगर पोलिसात खोट्या तक्रारी केल्या आहेत. दोन दिवसापूर्वी नातेवाईक मुलगा जालना येथे असताना त्याची पत्नी एकटीच घरी होती. तेथे सरिता माळी व इतर महिलांनी जावून सीसीटीव्ही कॅमेºयाच्या वायरींग कापून घर खाली करण्याची धमकी दिली.याआधी देखील या घरातील साहित्य फेकून दिले होते. हे घर खाली करण्यासाठी आम्ही सुपारी घेतली आहे, असे  धमकावले जात असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव