शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या उद्देशाने आलेल्या तरूणाचा महिलेवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 20:57 IST

चोरीच्या उद्देशाने आलेल्या मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरूणाने शेजारीच राहणाऱ्या प्रतिभा प्रदिप पाटील (वय ४७) या महिलेवर चार वेळेस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील शंकर अप्पानगरात घडली़

ठळक मुद्देपिंप्राळा परिसरातील घटनामहिलेच्या अंगावर चार ठिकाणी वारपोलिसांनी केली संशयित आरोपीला अटक

जळगाव : चोरीच्या उद्देशाने आलेल्या मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरूणाने शेजारीच राहणाऱ्या प्रतिभा प्रदिप पाटील (वय ४७) या महिलेवर चार वेळेस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील शंकर अप्पानगरात घडली़ या महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर तरूणास रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली़महिलेच्या पतीने व प्रत्यक्षदर्क्षींनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील शंकरअप्पा नगरात प्रदिप पाटील हे पत्नी प्रतिभा यांच्यासह वास्तव्यास आहेत़ दरम्यान, शहरात त्यांचे निर्मल अ‍ॅग्रो एजन्सी म्हणून भागीदारीत दुकान आहे़ त्यांना एक मुलगा असून तो नाशिक येथे शिक्षण घेत आहे़प्रदिप पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळपासून दुकानावर गेले़ त्यामुळे पत्नी प्रतिभा ह्या एकट्याच होत्या़ सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारा मनोज शिवाजी चंदेले हा पाटील यांच्या घरी आला़ त्यावेळी त्याने प्रतिभा यांच्या गळ्यातील मंगळपोत ओढण्याचा प्रयत्न केला़ यात दोघांमध्ये झटापटी होत असताना त्याने महिलेच्या गळ्यावर, पाठीवर तसेच पोटावर वार केले़ ही महिला गंभीररित्या जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या़चाकू हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, पाठीत चाकू भोसकल्यामुळे गंभीर इजा झाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली़ दरम्यान, पोलिसांकडून पाटील कुटूंबीयांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते़ या प्रकरणाबाबत रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रदिप पाटील यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मनोज चंदेले याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी मनोजला केली अटकचाकू हल्ला झाल्याची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनोज याचा शोध घेतला़ तो घरातच मिळून आल्यानंतर त्यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान,जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनील गायकवाड यांनी देखील रूग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेत घटनेची माहिती घेतली़रहिवाशांनी तोडला दरवाजाझटापटी होत असताना प्रतिभा यांचा आवाज आजुबाजुच्या रहिवाशांना आला़ त्यामुळे शेजारच्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली़ दार आतून बंद असल्यामुळे शेजारच्यांनी दरवाजा तोडत आत प्रवेश केला़ यावेळी त्यांना मनोज हा त्याठिकाणी बसलेला तर प्रतिभा पाटील या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या़ त्वरीत घटनेची माहिती प्रदिप पाटील यांना देत महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ वाहनातून नेले़ या घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळपोत देखील तुटलेली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली़

टॅग्स :crimeगुन्हेJalgaonजळगाव