शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड ग्रामीण रुग्णालयात महिलेने दिला सयामी जुळ््यांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:29 IST

डॉक्टरांनी वाचविले महिलेचे प्राण

ठळक मुद्देबालकांचा मृत्यू५० हजारातून एक केस

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - बोदवड येथे ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ममता बळीराम सोनवणे (२२, रा. करंजी, ता. बोदवड) या महिलेने छातीचा भाग जुळलेल्या दुर्मीळ अशा सयामी जुळ््यांना बुधवारी संध्याकाळी जन्म दिला. मात्र महिलेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने व अर्भकाचे पाय गर्भाशयाबाहेर आल्याने हे जुळे दगावले. दरम्यान, सुरुवातीपासून या महिलेने वेळीच तपासणी केली असती तर बालकांना वाचवून त्यांना वेगळेही करता आले असते, असे जळगावातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. उदयसिंग पाटील यांनी सांगितले.ममता सोनवणे या महिलेला बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची तपासणी केली असता तिच्या शरीरात केवळ सातच टक्के रक्त असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यात प्रसूती दरम्यान दोन्ही बालकांचे चारही पाय गर्भाशयाबाहेर आहे व महिलेची प्रकृती गंभीर होत गेली. तिला जळगावला हलविण्याशिवाय पर्याय नव्हता, मात्र तिची प्रकृती पाहता तिला हलविणेही शक्य नव्हते. त्या वेळी तेथे डॉ. धनश्री पाटील, डॉ. उदय पाटील, डॉ. राजेश बार्गल, डॉ. अमोल गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव येथे डॉ. उदयसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रसूतीबाबत मार्गदर्शन घेतले व आपले कसब पणाला लावून महिलेची सामान्य (नॉर्मल) प्रसूती केली. यामध्ये दोनही बालक दगावलेले असले तरी महिलेला सुरक्षित ठेवण्यात डॉक्टरांना यश आले.सुरुवातीपासून तपासणी केली नाहीसदर महिलेने सुरुवातीपासून कोणत्याच तपासण्या केल्या नसल्याचे सांगण्यात आले. तपासणी झाली असती तर तिच्या पोटात जुळे असल्याचे समजले असते व वेळीच योग्य प्रसूती होऊन सयामी जुळ््यांना मुंबई येथे हलवून वेगळे करता आले असते, असे डॉ. उदयसिंग पाटील यांनी सांगितले.५० हजारातून एक केस५० हजारातून एक असे दुर्मीळ सयामी जुळे आढळून येतात. मात्र या केसमध्ये महिलेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असताना तिने कधी तपासणीही केली नाही, त्यामुळे असा गंभीर प्रसंग ओढावला गेला. त्यासाठी महिलांनी व कुटुंबीयांनी वेळीच लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव