शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जळगाव : जम्मू काश्मीरमधील बर्फाच्छादित मार्ग खुला झाल्याने केळ्यांची मागणी तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:06 IST

साधारण केळीलाही किमान २७०० रु. प्रतिक्विंटलचा भाव

किरण चौधरी

जळगाव : जम्मू-काश्मीरसह लद्दाखमधील बर्फाच्छादित मार्ग आता खुला झाल्याने केळीची मागणी वाढली आहे. परिणामतः निर्यातक्षम केळीला ३२०० ते ३३५० रुपयांपर्यंत, तर साधारण केळीला २७०० ते २८०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे केळी उत्पादकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

जागतिक बाजारपेठेत केळीला प्रचंड मागणी आहे. आंध्र प्रदेशातील केळी उत्पादनाचा गाशा गुंडाळला जात आहे. त्यामुळे केळी आगारातील रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, यावल व चोपडा या तालुक्यांतील केळीला मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानासोबत केळी मालाच्या उत्पादनातही हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होत आहे.

चैत्र नवरात्रोत्सव व श्रीरामनवमी आणि रमजान महिना सुरू आहे. जम्मू-काश्मीर तथा लद्दाखपर्यंतचे बर्फाच्छादित मार्ग आता वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे तिथे केळी मालाच्या मागणीतही वाढ झाली आहे. दुसरीकडे उत्तर भारतातून केळीची मागणी आहे. यामुळे की काय निर्यातक्षम केळी मालाला ३२०० ते ३३५० रुपये, तर साधारण केळीलाही किमान २७०० ते ३००० रु. प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे तेजीत असलेली केळीची बाजारपेठ किमान दीड-दोन महिने अशीच स्थिर राहील, असे जाणकारांचे मत आहे. पिलबागांना उतरती कळा लागल्याने त्या केळी मालाच्या दर्जात काही अंशी घसरण होत आहे. यात गुणात्मक दर्जाप्रमाणे भावात १०० - २०० रुपयांची तफावत आढळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.केळीची आवक आणि मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे केळीची तेजी अशीच स्थिर राहील. ज्यांच्या पिलबाग अत्यंत विरळ आहेत, त्यांच्या केळी मालाच्या दर्जात काहीशी घसरण होत आहे. मात्र त्यामुळे केळीच्या भावावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.डी. के. महाजन, अध्यक्ष, सावदा केळी फळबागायतदार युनियन, रावेर

जागतिक पातळीवर केळीचा तुटवडा आहे. आपणाकडूनही निर्यात बंद आहे. मात्र, जम्मू-काश्मीर अन् लद्दाखचा मार्ग आता खुला झाला आहे. त्यामुळे केळीची बाजारपेठ तेजीत राहण्यास मोठा हातभार लागला आहे.प्रशांत महाजन, संचालक, महाजन बनाना एक्सपोर्ट, तांदलवाडी, ता. रावेर

टॅग्स :JalgaonजळगावJammu Kashmirजम्मू-काश्मीर