शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

शहरात लॉकडाऊन कडक होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:46 IST

लोकप्रतिनिधींकडून वाढू लागली मागणी : ठाणे, मीरा-भार्इंदर मनपाने निर्णय घेतल्याने

जळगाव : जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा शहरात पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे काही दिवस कडक लॉकडाऊन पुकारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपातील सत्ताधारी काही नगरसेवकांनीदेखील याबाबत मागणी केली आहे. ठाणे, मीरा-भार्इंदर महापालिकेनेदेखील तेथे रुग्ण वाढत असल्याने ११ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणेच जळगाव शहरातदेखील निर्णय घेण्यात यावा असेही काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे रस्त्यांवरही दररोज गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. त्यातच महापालिका प्रशासन शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास अपयशी ठरली आहे. महापालिकेसोबतच नागरिक देखील नियम पाळत नाहीत. राज्य शासनाने ही ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे संपुर्ण महिना नाही मात्र ११ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याबाबत दोन दिवसात काही पदाधिकारी आयुक्तांशी चर्चा करणार आहेत.शहर रेडझोनमध्ये असल्याने मार्केटमधील दुकाने उघडण्यास बंदी आहे. त्यामुळे जळगाव शहर जोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कायम राहिल तोपर्यंत दुकाने उघडता येणार नाहीत. यासाठी मनपाने ११ ते १५ दिवस कडक लॉकडाऊन जर पाडला तर रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण येईल व शहर रेडझोनमधून बाहेर येईल असे मत दोन आठवड्यांपुर्वी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले होते.तसेच स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी देखील जर शहराला रेडझोनमधून बाहेर काढायचे असेल तर काही दिवस कडक लॉकडाऊन करावा लागेल असे मत आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले होते.शहरात कडक लॉकडाऊनबाबत मनपा आयुक्तांना अधिकार आहे की नाही ? याबाबतची बुधवारी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. इतर मनपा जर रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेवू शकतात तर याबाबत काही मार्ग काढावा लागेल.-भारती सोनवणे, महापौर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव