शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

रुग्णालयाविषयी नव्याने विश्वास निर्माण करणार - डॉ. जयप्रकाश रामानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:48 IST

रुग्णालयातील दुर्दैवी घटनांनी कर्मचाऱ्यांचे खचलेले मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

आनंद सुरवाडेजळगाव : कोविडच्या तीन महिन्यात रुग्णालयाचे मनुष्यबळ थकलेले आहे, दुर्दैवी घटनांनी त्यांचे मनोबलही खचले आहे़ त्यांचे मनोबल वाढवून, सर्वांच्या समन्वयातून मृत्यूदर घटविणे व या रुग्णालयाविषयी सामान्यांमध्ये नव्याने एक विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे़ हे आव्हान आम्ही यशस्वीपणे पेलणार आहोत, असा विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला़प्रश ्न: राज्याचे सर्व लक्ष जळगाववर असताना शिवाय आधीचे अधिष्ठाता निलंबित झाल्यानंतर तुम्ही पदभार स्वीकारला याकडे कसे बघता?उत्तर : याकडे एक आव्हान म्हणून बघतो़ साध्या पिचवर कुणीही बॅटींग करू शकते़ आजपर्यंतचा माझा जो अनुभव आहे त्याची पूर्ण कसोटी लागणार हे निश्चित मात्र, या कसोटीवर खरा उतरण्याचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे़ सध्या मृत्यूदर घटविणे व रुग्णालयाची प्रतिमा उंचावून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही आव्हाने प्रामुख्याने आहेत़प्रश ्न:रुग्णालयात काय उणिवा जाणवल्या.. त्या दूर करण्यासाठी काय नियोजन आहे?उत्तर : वैद्यकीय अधीक्षक निलंबित झाल्यामुळे मी सर्व माहिती घेऊन एक सक्षम अधिकारी म्हणून डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांची नेमणूक केली़ औषधवैद्यक शास्त्राबाबत डॉ़ विजय गायकवाड यांच्याकडे जबाबदारी सोपावली़मनुष्यबळाचे नियोजन केल्यानंतर इंफ्रास्टकचरवर काम केले़ आॅक्सिजनचे काम करणाºया डॉक्टरांना केवळ साठा नव्हे तर सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून माहिती देण्याच्या सूचना दिल्या़ सेंट्रल आॅक्सिजनच्या पाईपलाईनच्या कामाला गती दिली़ १५० बेडचे काम पूर्ण झाले आहे़ काहींचे लवकरच होईल, उपसंचालक ठाणे यांच्याकडून २०० जम्बो सिलींडर मागविले असून शंभर आलेले आहेत़ यासह लवकरच १९ व्हँटीलेटर येणार आहेत़ मॉनीटर्स आले़प्रश ्न:अनेक डॉक्टर पगार घेऊन सेवा देत नसल्याचे आरोप वारंवार होत आहेत़उत्तर :जे डॉक्टर कामाला नाहीत त्यांना सर्वांना कामाला लावले आहेत़ नियमावलीनुसार सर्वांच्या ड्युट्या लावल्या आहेत़ जे कामावर नसतील त्यांचे पगार काढल्यास कारवाई करेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे़ याठिकाणी किती कर्मचारी आहेत कोणाकडेच याद्या नाहीत, त्या याद्या मागविल्या असून सर्वांशी बोलणार आहे़सर्वाच्या सुट्या रद्दसुट्या कोणाला मिळणार नाहीत. मुंबईहून १४ डॉक्टर्स आले असून २८ परिचारिका आल्या आहेत. बाहेरून आलेले डॉक्टर्स अनुभवी आहेत, त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यांच्या ड्युटी अतिदक्षता विभागात लावलेल्या आहेत़रुग्णाला आॅक्सिजनचा पुरवठा वेळेवर सुरळीत होणे अत्यावश्यक असते़ मात्र, रुग्ण संख्याच वाढणार नाही, याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे़ रुग्ण वाढले नाहीत तर मृत्यू होणार नाही, यात नागरिकांनी लवकर रुग्णालयात येणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे़गंभीर व आवश्यकता असल्यास सर्व सुविधा रुग्णांना जागेवरच देण्याचा प्रयत्न आहे़ त्यामुळे आगामी अप्रिय घटना टाळता येतील़- डॉ. रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Jalgaonजळगाव