शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:03 IST

पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते

चंद्रशेखर जोशीराजकीय पक्षांमध्ये पडझड, इकडून तिकडे जाणे हे सुरूच असते. मात्र एखाद्या पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते. जिल्हा कॉँग्रेसच्या बाबतीत नेमके असेच होत असल्याचे लक्षात येते. महापालिकेची २०१३ मध्ये निवडणूक झाली त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी अनेक दावे केले होते. मात्र ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी या पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. वास्तविक त्यावेळी हा पक्ष सत्तेत होता. त्यानंतर २०१४ मध्ये प्रथम लोकसभा निवडणूक लागली. या निवडणुकीतही पक्षाची धुळधाण झाली. त्यानंतर याच वर्षात विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. एकेकाळी कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख होती. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, स्व. मधुकराव चौधरी, स्व. जे.टी. महाजन, स्व. के.एम. पाटील यांच्या सारख्या दिग्गज मंडळींना पक्षाने विविध पदांवर संधी दिली. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यावेळी पक्षासाठी मोठे योगदान देऊन पक्ष वाढविला, मतदार संघ राखले. आज मात्र ते वैभव गायब झाल्याचीच प्रचिती येत आहे. नुकत्याच काही पालिका व जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. जामनेर पालिका, मुक्ताईनगर पालिका व त्यानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. या तिनही ठिकाणी कॉँग्रेसचे पानिपत झाले. एकाही जागेवर या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकले नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही जळगावला भेट देऊन गट, तट विसरा पक्ष वाढवा असा उपदेश केला. पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले विनायक देशमुख यांनीही अखेर हात टेकले व जळगाव जिल्ह्याची जबाबदारी नको रे बाबा...अशी भूमिका घेतली. असे असताना या जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभा राहील अशी आशा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना आजही आहे. त्यांनी ही आशा शहरातील बुद्धीजिवींशी संवाद साधताना व्यक्तही केली. पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ त्यांनी जळगाव जिल्ह्यातून केला. जनसंघर्षाची ‘ज्योत’ त्यांनी या जिल्ह्यातून प्रज्वालीत केली. आता जबाबदारी या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आहे. आजही या पक्षात गट-तट हे आहेच हे नाकारून चालणार नाही. त्यातूनच मोठी मर्गल निर्माण झाली आहे. पेटविलेल्या ज्योतीचा वणवा केला नाही तर... पूर्वी होती तीच स्थिती पक्षाची राहील.

 

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव