शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून संघर्ष कशासाठी, वेगवेगळी वक्तव्ये करणे टाळा - दीपक केसरकर 

By अमित महाबळ | Updated: November 19, 2023 12:06 IST

आरक्षण नुसते देऊन चालणार नाही तर ते कायद्याच्या निकषावर टिकावे लागेल आणि ते टिकेल याची खात्री आहे, असेही केसरकर म्हणाले.

जळगाव - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर वेगवेगळी वक्तव्य करण्यापासून सर्वांनीच अलिप्त राहायला पाहिजे. सरकार म्हणतेय ओबीसी व मराठा समाज या दोघांच्या मागण्या मान्य आहेत, तर मग आपापसात संघर्ष कशासाठी, असा थेट मुद्दा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मांडला आहे. ते रविवारी, सकाळी जळगावच्या शासकीय विश्रामृहात माध्यमांशी बोलत होते.      

मराठा व ओबीसी समाजाचे नेते आरक्षणाच्या मुद्यावरून एकमेकांवर टीका करत आहेत. यावरील प्रश्नावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, की सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. आपणच ते बळकट केले पाहिजे. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने गेला तरच अनेक खासगी नोकऱ्या तयार होणार आहेत पण महाराष्ट्र असंतुष्ट राहिला, दंगली झाल्या तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असते, खासगी नोकऱ्या ९० टक्के असतात. उद्योग वाढविले, तरच खासगी नोकऱ्या येतील, युवकांना रोजगार मिळेल. त्यासाठी शांतता नांदणे महत्वाची आहे.

आरक्षण देणे सरकारची जबाबदारी...आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मराठा समाजाने सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे. मराठा समाज मागासलेला आहे हे कोर्टासमोर सिद्ध करण्यासाठी इम्पिरिकल डाटा जमा करावा लागणार आहे. आंदोलन होऊन गेले, मागणी मान्य झाली. पूर्वीही मान्य होती. आता समाजाची बाजू व्यवस्थित बळकट करून टिकणारे आरक्षण देणे ही काळाजी गरज आहे. हे करत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार कुठलाही धक्का लागू देणार नाही. ही शासनाची भूमिका आहे. 

इम्पिरिकल डाटा, हातात हात घालून काम करा...सुप्रीम कोर्टाने क्युरिटीव्ह पिटिशन ऐकण्याची तयारी दाखवली आहे. मराठा समाजाचे आरक्षण नाकारताना कोर्टाने जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यावर योग्य स्पष्टीकरण मांडावे लागणार आहे. त्यासाठी इम्पिरिकल डाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे केवळ सरकारवर जबाबदारी न टाकता मराठा समाज व सरकार यांनी हातात हात घालून हे आरक्षण टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासन पूर्ण प्रयत्न करत आहे. आरक्षण नुसते देऊन चालणार नाही तर ते कायद्याच्या निकषावर टिकावे लागेल आणि ते टिकेल याची खात्री आहे, असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maratha Reservationमराठा आरक्षण