शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलात निवड झालेल्या लक्ष्मीला निरोपासाठी सारे गाव झाले भावनाविवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 00:29 IST

पोलीस दलात निवड झालेल्या लक्ष्मीला निरोपासाठी सारे गाव भावनाविवश झाले होते.

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव : ग्रामीण भागात आजदेखील प्रेमाचं वलय कायम आहे. प्रेमभाव आजही जिवंत आहे. सुख असो वा दु:ख यात सारेच सहभागी होत असतात. एकतेचे जिवंत उदाहरण आजदेखील ग्रामीण भागात पहावयास मिळते. गोंडगाव येथील कन्या लक्ष्मी चौधरी हिची सैन्यदलातील आसाम रायफलमध्ये पोलीस शिपाई  म्हणून निवड झाली आहे. ती प्रशिक्षणासाठी नागालँड जाणार असल्याने तिला निरोप देण्यासाठी सारा गावच एकवटला होता. याप्रसंगी प्रत्येकाचे डोळे पाणावले.   गोंडगाव येथील रहिवासी धनराज चौधरी यांची कन्या लक्ष्मी चौधरी हिची आसाम रायफलसाठी निवड झाली. दि.२७ रोजी ती प्रशिक्षणासाठी नागालँड येथे जाणार असल्याने सारा परिवार, आप्तेष्ट व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी रवाना होताना घराच्या परिसरात जसा मुलीचा बिदाई समारंभच होत असल्याचे वातावरण तयार झाले होते. लक्ष्मी घरातून बाहेर आल्यावर परिवाराच्या महिला सदस्यांना गळाभेट घेत ओक्साबोक्शी रडत असल्याने उपस्थित साऱ्यांचे डोळे पाणावले होते. याप्रसंगी देशभक्तीवर आधारित धून, गाणे याद्वारे लक्ष्मीला निरोप देण्यात आला, तर अनेक युवकांनी देशभक्तीवर आधारित धुनवर व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर टाकला. निरोप समारंभाचा हा व्हिडीओ अनेकांना भावला तर हा पहाता पहाता अनेक महिलांनी अश्रूंला वाट मोकळी करून दिली. निरोप समारंभप्रसंगी परिवार, आप्तेष्ट, गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव