कुजबुज- प्रादेशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:16 AM2021-07-28T04:16:20+5:302021-07-28T04:16:20+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील २२ रेशन दुकानांची चौकशी करण्यात आली. कोरोनाकाळातील मोफत धान्य वितरणाबाबत मोठा घोळ असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ...

Whispers - Territorial | कुजबुज- प्रादेशिक

कुजबुज- प्रादेशिक

Next

गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील २२ रेशन दुकानांची चौकशी करण्यात आली. कोरोनाकाळातील मोफत धान्य वितरणाबाबत मोठा घोळ असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यात रुबजीनगर भागातील दुकानदाराच्या अनियमिततेमुळे, तसेच त्रुट्या असल्याने त्या दुकानदाराची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आणि दोषी आढळल्याने त्याचे दुकान काढून घेण्यात आले. जादाची दुकाने जोडून नफा कमावणाऱ्या रेशन दुकानदाराचे नुकसान झाल्याने तो चांगलाच दुखावला. हे दुकान दुसऱ्या एका राजकीय वर्चस्व असलेल्या दुकानदाराला जोडण्यात आले. त्यामुळे पहिल्याच्या मनात खदखद होतीच. त्या बहाद्दरने थेट गरिबांची वस्ती गाठली आणि तेथील नागरिकांना पटवून पहिला दुकानदार आम्हाला व्यवस्थित धान्य वाटप करीत होता तर दुसरा दुकानदार धान्य वाटप करीत नाही अशी तक्रार करायला लावली. त्या तक्रारींवर अनेकांचे अंगठे होते त्यामुळे त्यांनी तक्रार वाचली की नाही याबाबत शंका होती. दुसऱ्या दुकानदाराला धान्य मिळाल्यानंतर वाटप करायला अवधी मिळाला नाही, तर तेवढ्यात दोषी दुकानदाराला परत दुकान देण्याची मागणी चाणाक्ष अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. एवढा खटाटोप करूनही काहीच उपयोग झाला नाही.

-संजय पाटील, अमळनेर

Web Title: Whispers - Territorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.