स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, कामगारदिन अशा विशेष दिनाला आत्मदहन, उपोषण आणि आंदोलनाचा इशारा देण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. यात काही वास्तवही आंदोलने असतात मात्र बऱ्याचदा स्टंटबाजीसाठीही आंदोलन केल्याचे दिसून येते, असे आंदोलन पाहून मात्र हसेच होते.
काही दिवसांपूर्वी अमळनेर येथे एका विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांचा एक प्रश्न उचलून धरला तेव्हा या संघटनेचे कौतुक झाले. मात्र तांत्रिक अडचणी आणि निर्णय येण्याची वाट न पाहता संघटनेच्या नेत्यांनी पुन्हा अवघ्या ४८ तासांत आत्मदहनाचा इशारा दिला. विद्यार्थी जमले, अंगावर पेट्रोलही टाकले अन् काय डोळ्यात पेट्रोल गेले व अंगाची आग होताच पाणी आणारे म्हणून आरोळ्या सुरू झाल्या. आता पुढे काय करायचे हे सुचत नव्हते. म्हणून खालीच झोपले. पोलिसांनाही हसू आवरले गेले नाही. एवढे करूनही प्रताप महाविद्यालयाने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ , चौकशी करू असेच उत्तर पुन्हा दिल्याने मात्र आंदोलकांची गोची झाली.
- संजय पाटील, अमळनेर