जळगाव : सेवा पुस्तकाची प्रत व इतर कागदपत्रे देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा पी.एम.मुंदडे विद्यालयाचा मुख्याध्यापक भरत धुडकू पाटील ( ५७, रा. शिवराणा नगर, जळगाव) व लिपीक संजय श्रीकृष्ण कुळकर्णी ( ५१, रा. मंगलमूर्ती नगर, पिंप्राळा) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. मुदंडा शाळेतच गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार महिला ही पिंंप्राळा परिसरातील पी.एम.मुंदडे विद्यालयात कार्यरत आहे. त्यांची आता तेथून लुंकड विद्यालयात बदली झाली आहे. नोकरीबाबतचे सेवापुस्तक व इतर कागदपत्रांची फाईल मुख्याध्यापक पाटील व लिपीक कुळकर्णी यांच्याकडे होती. ही कागदपत्रे देण्यासाठी वरील दोघांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावर ही कारवाई करण्यात आली.
पाच हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकासह लिपिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 22:32 IST