शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजू शेट्टींच्या आंदोलनात आमचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 17:32 IST

प्रमोद पाटील : सरकारने दूध उत्पादकांचा अंत पाहू नये

चाळीसगाव, जि.जळगाव : दूध भुकटीचे दर पडल्याने दूधाचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून पडले असून, सरकारने दूध भुकटीसाठी अनुदान देण्याबाबत सकारात्मकता दाखवली पाहिजे. दूध उत्पादक आणि पशुपालक अडचणीत असल्याने सरकारने मागणीचा विचार करावा, अन्यथा खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी दिला आहे.खासदार राजू शेट्टी यांनी दूध भुकटीसाठी अनुदान किंवा कर्नाटक सरकारप्रमाणे दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये थेट अनुदान देण्याची मागणी करताना आंदोलनाचे हत्यार उपासण्याचे बिगूल वाजविले आहे; याला प्रमोद पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.सद्य:स्थितीत जिल्हा दूध संघ या समस्येला सामोरा जात आहे. दूध भुकटीचे दर वाढत नसल्याने दुधाचे खरेदी दर कमी करण्याचा कडू निर्णय आम्हाला घ्यावा लागला. दूधाच्या अर्थकारण भुकटीला अनुदान दिल्याशिवाय ताळ्यावर होऊ शकत नाही.वैरण, वैद्यकीय उपचार यांचे दर वाढल्याने दुध उत्पादकांची परवड वाढली आहे. एक लीटर बिसलरीचे पाणी आणि दूधाची किंमत सारखीच झाली असून, या अरिष्टामुळे दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने दूध उत्पादकांसाठी तारणहार भूमिका घ्यावी.याबाबत सरकारने चालढकल केल्यास जाहीरपणे राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होऊन जळगाव जिल्हा ढवळून काढू, असेही पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीChalisgaonचाळीसगाव