आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ : एरंडोल येथे ‘अकाउंट’च्या कामासाठी जळगाव येथून जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने अमितकुमार रामगोपाल पांडे (वय ३७ रा. कोल्हे नगर, जळगाव) हे अकाउंटट जागीच ठार तर त्यांचे मित्र गोपाल राजूरकर (रा.जळगाव) हे जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्टÑीय महामार्गावर उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाजवळ झाला.असा झाला अपघातयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमितकुमार पांडे व गोपाल राजूरकर हे शनिवारी सकाळी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.वाय.४०९०) एरंडोल येथे जात असताना उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे प्रवेशद्वार सोडल्यानंतर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने (क्र.एम.एच.२० डी.ई.५३०३) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघंही दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. अमितकुमार यांना ट्रकचा जोरदार फटका बसल्याने ते जागीच गतप्राण झाले.रस्त्यावरुन ये-जा करणाºयांनी केली मदतरस्त्यावरुन जाणाºया लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जणांनी पाळधी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील व सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीवरील दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले तर ट्रक चालक भिकन महादू सोनार (रा.पाळधी खुर्द, ता.धरणगाव) याला ताब्यात घेतले. अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावात कामासाठी जात असताना ट्रकने अकाउंटटला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:51 IST
उमविजवळ महामार्गावर अपघात : पांडे कुटुंबांचा आक्रोश; कोल्हेनगरात शोककळा; अपघातात मित्र बचावला
जळगावात कामासाठी जात असताना ट्रकने अकाउंटटला चिरडले
ठळक मुद्देउमविजवळ महामार्गावर अपघातपांडे कुटुंबांचा आक्रोशअपघातात मित्र बचावलाकोल्हेनगरात शोककळा