शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कुटूंबीय गच्चीवर असताना सिलिंडर, दुचाकी घेवून चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:04 IST

जळगाव : कुटुंबीय घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले असताना बंद घर पाहून रात्रीच चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत आत प्रवेश ...

जळगाव : कुटुंबीय घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले असताना बंद घर पाहून रात्रीच चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील सर्व साहित्याची उलथापालथ करूनही मौल्यवान वस्तू दागिने, रोकड न मिळाल्याने चोरट्यांनी चक्क स्वयंपाक घरातील सिलिंडर आणि घरासमोरील दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.प्रेमनगर परिसरातील लक्ष्मण नगरात प्लॉट क्र.(०८/१) येथे योगेश वामन वाणी (कामळस्कर ) हे पत्नी कांचन, मुलगा आदित्य, मुलगी समीक्षा आदी कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहे. फ्लॅट,जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून ते घरचा उदरनिर्वाह करतात़ तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळे सद्या प्रचंड उकाडा जाणवत असल्याने गच्चीवर मोकळ्या हवेत वाणी कुटुंबीय झोपायला जातात. नेहमी प्रमाणे शनिवार रोजी घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबीय गच्चीवर झोपण्यासाठी गेले़ घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दाराचा कडीकोयंडा तोडून आत चोरी केली. घरातील कपाटातील आणि इतर सर्व साहित्याची उलथापालथ करून चोरट्यांच्या हातात काहीच लागले नाही.पोलिसात गुन्हा दाखलचोरट्यांना संपूर्ण घर शोधूनही काहीच सापडले नाही, म्हणून चोरट्यांनी स्वयंपाक घरातील सिलिंडर आणि कंपाउंडमध्ये उभी असलेली दुचाकी (एम.एच.१९़ ए.के. ६३३३) चे हॅण्डल लॉक तोडून सिलेंडरसह दुचाकी चोरून नेली. तर, योगेश वाणी यांचा मुलगा आदित्य याची मोपेडचे हॅण्डल लॉक तोडण्याचा प्रयत्न करूनही तोडता न आल्याने ती सुरक्षित राहिली. योगेश वाणी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव