शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:56 IST

काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले आहोत, असा गंड त्यांनी स्वत:शी प्रयत्नपूर्वक जोपासलेला असतो. अशी माणसं जाणीवपूर्वक बापूडवाणी ...

काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले आहोत, असा गंड त्यांनी स्वत:शी प्रयत्नपूर्वक जोपासलेला असतो. अशी माणसं जाणीवपूर्वक बापूडवाणी असतात, दीनवाणी हसतात आणि केविलवाणी दिसतात.पण म्हणजे ती खरोखरीच तशी असतात असं नाही. सुप्रसिद्ध देवस्थानीच्या भिकाऱ्याला, बॅँकेत लाखो रुपये जमा असूनही भीक मागण्याचा धंदा चालवण्यासाठी जसे, केविलवाणे, बापुडवाणे, भणंग, दरिद्री रूप धारण करावे लागते, तशी ही माणसं आतून अहंकार, महत्त्वाकांक्षी वगैरेच असतात. कोणी सहानुभूती दाखवत त्यांना म्हटलं की ‘अप्पासाहेब, खरंच तुमच्या लायकीपेक्षा तुम्हाला फारच कमी मिळालंय. जे मिळालंय ते अगदी न मिळाल्यासारखं, नगण्य आहे.!’ की अंतरी सुखावत अप्पाजी म्हणणार, ‘माझ्या लायकीनुसार माझ्या पदरात माप घाला, अशी भीक मागत मी कोणापुढे पदर पसरणाºयांतला नाही. तुमच्यासारख्या गुणग्राहक स्रेह्याला माझी कदर आहे हेच खूप झालं.’ खरेतर अप्पाजी आतून सुखावलेले असतात आणि तो सद्गृहस्थही मनातल्या मनात हसत असतो. कारण अप्पाजींनी मागल्या दाराने किती सत्ताधिशांपुढे डोळ्यात पाणी आणून आणून पदर पसरलेले आहेत, हे त्याला चांगले माहीत असते. एखाद्याला भस्म्यारोग झालेला असला की त्याला कितीही खाऊ घातलं तरी आणखी हवं असतं. तसं अशा व्यक्तीची स्वकौतुकाची भूक कधीच भागत नाही आणि म्हणून आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्याला काहीच मिळालेलं नाही, ही खंत बाळगत ते आयुष्यभर ‘खपाटपोटी’ जगतात.अतृप्त आत्म्यांचे म्हणतात, मेल्यावर भूत होते,ह्या अतृप्तांचे भूत, जिवंतपणीच झालेले असते.लायकीपेक्षा ह्यांना जास्तच मिळालेले असते,त्यांच्या लेखी मात्र ते खूप्पच कमी असते.असे अतृप्त, जीवनाची माती करून घेतात,जीवन म्हणजे सरणापुढचे क्रंदन करून घेतात.(पूर्वार्ध)- प्रा. अनिल सोनार

टॅग्स :Jalgaonजळगाव