शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्काराच्यावेळी मृत झालेली व्यक्ती चालत येते तेव्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:47 IST

मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेऊन आंघोळीची तयारी करीत असताना त्याच वेळी समोरुन ती व्यक्ती चालत आल्याने सर्वांना आश्चयार्चा धक्का बसला. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुणालयातून आणलेला मृतदेह एकदा निरखून पाहिला. ही व्यक्ती ती नसल्याची खात्री पटल्यानंतर तो मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शनिवारी मेहरुणमध्ये घडलेल्या या घटनेची दिवसभर चर्चा होती.

ठळक मुद्देजळगावात धक्कादायक प्रकार पोलिसांनी केली दुस-याची व्यक्तीची नोंद 

जळगाव : मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेऊन आंघोळीची तयारी करीत असताना त्याच वेळी समोरुन ती व्यक्ती चालत आल्याने सर्वांना आश्चयार्चा धक्का बसला. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुणालयातून आणलेला मृतदेह एकदा निरखून पाहिला. ही व्यक्ती ती नसल्याची खात्री पटल्यानंतर तो मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शनिवारी मेहरुणमध्ये घडलेल्या या घटनेची दिवसभर चर्चा होती.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा रुग्णालयाच्या भींतीजवळ  ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरिक्षक संदीप आराक व सुनील जोशी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.नंतर मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. मृत व्यक्तीचे नातेवाईक मेहरुणमधील जोशी वाड्यात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस तेथे पोहचले.अमीर शेख हा तरुण मृतदेह पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आला. मृत व्यक्ती माझे मामा असून त्यांचे नाव नाजीम शेख अहमद आहेत असे सांगून त्याने मृतदेह ओळखला. त्यामुळे ही घटना घरी कळविण्यात आली. त्यानुसार मृतदेह मेहरुणमधील जोशीवाड्यात नेण्यात आला. तेथे आंघोळीची तयारी करीत असतानाच नाजीम शेख समोरुन चालत आले. त्यांना समोरुन पाहून सर्वांनाच आश्चयार्चा धक्का बसला.मृत्यूची नोंद नाजीमच्याच नावाचीजिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करताना पोलिसांनी मृत व्यक्ती म्हणून नाजीमचीच नोंद केली. नंतर ही व्यक्ती जीवंत असल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांचीही अडचण झाली. कागदपत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याने उशिरापर्यंत याच विषयावर मंथन सुरु होते तर नातेवाईकही जिल्हा पेठ पोलिसात थांबून होते. दरम्यान, नाजीम शेख यांची पत्नी व मुले सोडून गेल्याने २० वषार्पासून त्यांची मानसिकस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे ते सतत बाहेरच असतात, असे नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव