शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब घरात झोपलेले असताना जळगावात चोरट्यांनी लांबविला लाखोचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 20:47 IST

कुटुंबिय घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना आतून बंद असलेल्या बेडरुमचा दरवाजा उघडून चोरट्यांनी युवराज अशोक नेहेते (४०, रा. देविदास नगर, जुना खेडी रोड) यांच्या कपाटातील ४० हजार रुपये रोख व दागिने असा एकूण १ लाख ३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे चार वाजेच्या सुमारास जुना खेडी रोड परिसरात उघडकीस आली. 

ठळक मुद्दे  जुना खेडी रस्त्यावर चोरी  खिडकीतून हात टाकून उघडला दरवाजा शहरात चो-यांचे सत्र सुरुच

जळगाव : कुटुंबिय घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना आतून बंद असलेल्या बेडरुमचा दरवाजा उघडून चोरट्यांनी युवराज अशोक नेहेते (४०, रा.देविदास नगर, जुना खेडी रोड) यांच्या कपाटातील ४० हजार रुपये रोख व दागिने असा एकूण १ लाख ३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे चार वाजेच्या सुमारास जुना खेडी रोड परिसरात उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांनी अलगदपणे खिडकीतून हात टाकून दरवाजाचा कडी उघडून चोरी केली आणि परत जाताना बाहेरुन कडी लावून घेतली होती. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात रोज चो-या व घरफोड्या होत असून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.शहरातील जुना खेडी रोड परिसरातील देविदास नगरात युवराज अशोक नेहते हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. एमआयडीसी परिसरातील पॉलीमर कंपनीत मजूर म्हणून कामाला असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवितात. रविवारी रात्री जेवणानंतर नेहते कुटुंबिय १०.३० वाजता हॉलमध्ये झोपले होते. घराचा मुख्य दरवाजा तसेच बेडरुमच्या मागील बाजूच्या दरवाजाला आतून कडी लावली होती.बाहेरुन कडी लावून पोबाराचोरट्यांनी बेडरुमच्या मागील बाजूच्या खिडकीतून हात टाकून आतून बंद असलेला दरवाजा उघडला. कुठलाही आवाज न करता कपाटाचे कुलूप तोडले व त्यातील दीड तोळ्याची ३० हजार रुपयांची सोन्याची पोत, दहा ग्रॅमचे कानातले २५ हजार रुपयांचे तीन कर्णफुले, १ ग्रॅमचे ८ हजार रुपयांचे मंगळसूत्र, २ ग्रॅमचा नेकलेस, २०  ग्रॅमचे पैंजण असे ८००  रुपयांचे चांदीचे दागिने व ४० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३ हजार रुपये ८०० रुपयांचा ऐवज लांबविला. पहाटे चार वाजता नेहते यांच्या पत्नी उठल्या असता त्यांना बेडरुममध्ये सामान अस्ताव्यस्त तर खोलीला बाहेरुन कडी लावलेली असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव