शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चेंडू काढताना विद्यार्थी शाळेच्या इमारतीवरुन कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:38 IST

क्रिकेट खेळताना खुबचंद सागरमल विद्यालयाच्या इमारतीवर चेंडू घेण्यासाठी पाईपावरुन चढत असताना अचानक पाईप तुटल्याने विशाल कृष्णा दुधाने (वय १९, रा.गेंदालाल मील, शिवाजी नगर) हा विद्यार्थी जमिनीवर पडल्याची घटना दुपारी दीड वाजता घडली.

ठळक मुद्देजळगावातील खुबचंद सागरमल विद्यालयातील घटनामेंदूला मार लागल्याने हा विद्यार्थी कोमातपाईपावर चढत असताना वजनामुळे तुटला पाईप

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१८ : क्रिकेट खेळताना खुबचंद सागरमल विद्यालयाच्या इमारतीवर चेंडू घेण्यासाठी पाईपावरुन चढत असताना अचानक पाईप तुटल्याने विशाल कृष्णा दुधाने (वय १९, रा.गेंदालाल मील, शिवाजी नगर) हा विद्यार्थी जमिनीवर पडल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. मेंदूला मार लागल्याने हा विद्यार्थी कोमात गेला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दीड वाजता शिवाजी नगरातील खुबचंद सागरमल विद्यालयाजवळ गल्लीतील मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू विद्यालयाच्या इमारतीवर गेला. हा चेंडू घेण्यासाठी तो पाईपावर चढत असताना त्याच्या वजनामुळे पाईप तुटला. त्यात तो पाईपासह शेजारच्या भींतीवर आदळला व नंतर जमिनीवर पडला. गंभीर जखमी झालेल्या विशाल याला मित्रांनी खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टर बोलावून उपचार करण्यात आले. मेंदूला जबर मार बसल्याने मेंदू निकामी होऊन तो कोमात गेला आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी डॉक्टरांनी प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केल्याने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. मनपातील लिपिक कृष्णा दुधाने यांचा मुलगा असून नूतन मराठा महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू