शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नवविधा काय बोलिली जी भक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:26 IST

परमेश्वराचे श्रवण किर्तन सेवा

भक्तिचे दुसरेनाव म्हणजे उपासना ! भक्तिे ही सर्वाधिकार सेव्य आहे. नवविधा म्हणजे एकूण भक्तीचे नऊ प्रकार आहेत.श्रवणं किर्तनं विष्णे । स्मरण पाद सेवन् ।अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्म निवेदनम् ।।परमेश्वराचे श्रवण किर्तन सेवा, स्मरण, पूजा, वंदन दास्य, सख्य आणि आत्मभावाने आत्म निवेदन’ अशी ९ प्रकारची भक्ती आहे.भक्ताची व्याख्या विभक्त नव्हे तो भक्त अशी केली जाते. भक्त स्वत:ला भगवंताचा दास मानतो. अशी ही अपरा नावाची भक्ती आहे.पराभक्ती ही सर्वांहून श्रेष्ठ आहे. पराभक्ती हेच भक्ती मार्गाचे श्रेष्ठत्वाचे स्थान आहे. भक्ताला साकारातून निराकारात जावयाचे असते. सगुणातून निर्गुणात द्वैतातून अद्वैतात. शुभारंभ होतो तो आकारात आणि इतिश्री निर्गुणत आणि निराकारात आधी द्वैत मग अद्वैत भक्तीची सुरुवात साकार सगुण भगवंतापासून आणि शेवट निर्गुण निराकार परमात्मा मध्ये होतो. म्हणून भक्त सगुणाच्या आधाराने निर्गुण स्वरूपात आपले मन स्थिर करू शकतो. परम प्रेमाच्या रस्त्याची सुरुवात एकातून नव्हे तर दोनातून होतो. पण शेवट दोघांमध्ये होतो. उपासनेनेच अंतिम अद्वतात जाता येते. उपासना भक्ती भक्ताला हळूहळू भगवंतांशी एक करत जाते.अद्वैताचा अनुभव हेच भक्ती योगाचे शेवटचे तत्त्व आहे. भक्ताचे भगवंत स्वरूपात विलीन होणे हेच उपासनामार्गाचे ध्येय असायला हवे. तिच खरी पराभक्ती होय. म्हणूण भगवान सांगतात की अनन्य भक्तीने तो भक्त जो आणि जसा परमात्मा आहे तसा त्याला जाणतो. त्याला अनुभवतो त्याच्यातच प्रवेश करतो, त्याच्याशीच एक होतो. परमात्माच होतो. ब्रह्म ज्ञानाची अनुभूती त्या भक्ताला येते. मग गोपींच्या शब्दात सांगावयाचे झाल्यासलाला देखन मैं गयी । मे भी भयगई लाला ।।संतांच्या भाषेत हीच गोष्ट सांगावयाची झाल्यासदेव पहावयासी गेलो । देवच होवोनिया ढेलो ।।हिंदी कवींच्या शब्दात सांगावयाचे झाल्यासढुंडा सकल जहाँ मे तब पता तेरा नही ।और जब पता तेरा लगा तो अब पता मेरा नही ।।तर ही किमया नवविधा भक्तीमध्ये आहे व नवविधा भक्ती ही संत कृपेशिवाय प्राप्त होत नाही म्हणून संतांजवळ मागावयाचे आहे की,नवविधा काय बोलिली जी भक्ती ।द्यावी मज हाती संत जनी ।।-दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव