शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘पायाभूत’चे ‘भूत’ आॅगस्टमध्ये कशासाठी?, अभ्यासकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:49 IST

मंगळवारपासून परीक्षा

ठळक मुद्देक्षमता समजण्यासाठी चाचणीचाचणीच्या निकालाबाबत साशंकता

विलास बारीजळगाव : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २८ ते ३१ आॅगस्ट दरम्यान इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी होत आहे. जून महिन्यात होणारी ही चाचणी यावेळी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे शासनाचे प्रयोजन काय? असा सवाल अभ्यासकांकडून उपस्थित होत आहे.महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे तर्फे गेल्या तीन वर्षांपासून इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जात आहे.क्षमता समजण्यासाठी चाचणीपायाभूत चाचणी ही मागील वर्गांच्या मुलभूत क्षमतांवर आधारित असते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात यावी. तसेच त्यांच्यातील प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. विद्यार्थ्यांना मराठी, गणित, इंग्रजी हे विषय शिकविले जावे हा उद्देश आहे. सुरुवातीला जून महिन्याच्या अखेर ही चाचणी घेण्यात येत होती. मात्र यावर्षी ही चाचणी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होत आहे.चाचणीच्या निकालाबाबत साशंकताप्रायोगिक तत्वावर प्रथम भाषा व गणित या दोन विषयांच्या वर्षभरात तीन शैक्षणिक प्रगत चाचण्या घेण्याचे २२ जून रोजी काढलेल्या शासन निर्णयात नमूद केले होते. त्यानुसार २०१६/१७ मध्ये २८ व २९ जुलै दरम्यान घेतली होती. आता जून ऐवजी पहिल्यांदाच ही चाचणी आॅगस्टमध्ये घेण्यात येत आहे. हे होत असताना या चाचणीच्या निकालाचे कोणतेही विश्लेषण मात्र होत नाही. तसेच अप्रगत विद्यार्थ्यांना ‘प्रगत’ करण्यासाठी शाळांनी कोणते उपाय केले याबाबतची माहित समोर येत नाही, असे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.वाचता न येणारे विद्यार्थी प्रश्न कसे सोडविणार?पायाभूत चाचणीच्या दर्जाबाबतदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी या विषयाचे प्रश्न वाचता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका सोडविणे अवघड होत आहे. त्यात या विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न मराठी भाषेतून समजावून सांगत सोडवून दाखावे लागतात. ‘चित्र पहा, त्यावर गोष्ट लिहा’ या प्रश्नासाठी ५ गुण देण्यात आलेले असतात. मात्र इयत्ता २ री ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना चित्रवाचन जमत नसल्याने अनेक शाळांकडून तयार उत्तर विद्यार्थ्यांना द्यावे लागत असते.अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक संपल्यानंतर वर्गातल्या वर्गात १० गुणांची परीक्षा घटक चाचणी स्वरुपात घेतली जाते. आज तो अर्थ पूर्णपणे विसरत शिक्षण विभाग पायाभूत चाचणी घेत आहे. ही बाब चिंताजनक आहे.-चंद्रकांत भंडारी, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव