आम्ही आमच्या गावाचा विकास करण्यास सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:27 AM2021-03-04T04:27:33+5:302021-03-04T04:27:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास ...

We were able to develop our village | आम्ही आमच्या गावाचा विकास करण्यास सक्षम

आम्ही आमच्या गावाचा विकास करण्यास सक्षम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास झालेला नाही. तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर एखाद्या खेडेगावापेक्षाही खराब स्थिती जळगाव शहराची झाली आहे. त्यामुळे जळगाव शहराची स्थिती सत्ताधाऱ्यांनी सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे, हद्दवाढीसारखे ठराव सत्ताधाऱ्यांनी करू नयेत, महानगरपालिका जर पिंपरी-चिंचवड सारखी राहिली तर हद्दवाढीचा विचार होवू शकतो. मात्र, जी महापालिका हद्दीत असलेल्या कॉलन्यांचा विकास करू शकत नाही. ती महापालिका आमच्या गावांचा काय विकास करेल अशा संतप्त प्रतिक्रिया देत सावखेडा ग्रामस्थांनी देखील मनपा हद्दवाढीचा प्रस्तावाला विरोध केला आहे.

सावखेडा हे गाव जळगाव शहरापासून ६ किमीच्या अंतरावर आहे. तसेच लहानशे खेडे असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास बऱ्यापैकी होत असून, त्यात महापालिकेच्या हद्दीत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना लहानलहान अडचणी सोडविण्यासाठी इतर महापालिकेत जावे लागेल. तसेच जळगाव शहरातील नागरिकच आता महापालिकेला कंटाळले असून, महापालिकेपेक्षा एखाद्या गावाची ग्रामपंचायतच चांगली असते असे जळगावकर म्हणत आहेत. अशा परिस्थितीत आमच्या गावाचा समावेश महापालिका हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली आहे.

ठराव रद्द केलाच पाहिजे, आमचा विरोध राहणारच

कोणत्याही परिस्थितीत सावखेडा गावाचा समावेश जळगाव महापालिकेच्या हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली असून, मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा. तसेच हा ठराव रद्द न केल्यास महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा आणला जाईल असा इशारा सावखेडा गामस्थांनी दिला आहे.

कोट..

सावखेडा गावाचा सर्वांगिन विकास करायला आमची ग्रामपंचायत पुर्णपणे सक्षम आहे. महापालिकेच्या हद्दीत जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महापालिका ठराव करू शकते, तर आमची ग्रामपंचायत देखील महापालिकेत न जाण्याचा ठराव करू शकते. त्यामुळे आमच्या गावातील नागरिकांचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे.

-भगवान पाटील, सरपंच

बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांची जमिनी हडपण्याचा हा डाव आहे. मात्र, आम्ही ग्रामस्थ या ठरावाला कडाडून विरोध करू. पालकमंत्र्यांकडे याबाबतचे निवेदन देवून हा ठराव रद्द करण्यासाठी प्रयत्न करु.

-मंगेश पानपाटील, सदस्य, ग्रामपंचायत

सावखेडा गावाचा विकास हा जळगाव शहरापेक्षा बराच चांगला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत आहेत. अशा परिस्थितीत जळगाव शहराचा हद्दीत गावाचा समावेश झाला तर आमच्या गावाचे गावपण कायमचे हरवून जाईल. त्यामुळे मनपाच्या ठरावाला आमचा विरोध आहे.

- रिता पवार, सदस्या, ग्रामपंचायत

जळगाव शहराचा नागरिकांना सुविधा मिळत नाही, आणि महापालिका हद्दीत इतर गावांचा समावेश करण्याचा ठराव करणे म्हणजे, स्वत:चे मुलं सांभाळता येत नाही आणी दुसऱ्यांचे मुलं दत्तक घेण्यासारखेच आहे. आधी जळगाव शहराचा विकास सत्ताधाऱ्यांनी करावा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार केला पाहिजे.

-उत्तम चौधरी, ग्रामस्थ, सावखेडा

Web Title: We were able to develop our village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.