शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चुका काढायला नाही तर मदतीला आलोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:26 IST

केंद्रीय समितीचा दिलासा : प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी, ‘कोविड’ मध्ये आढावा बैठक

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय केंद्रीय समितीने शहरातील कौतिक नगर, शिवाजीनगरात पाहणी केली़ कोविड रुग्णालयात बैठक घेऊन आम्ही चुका काढायला नाही तर तुमच्या मदतीसाठी आलो असल्याचे समितीचे प्रमुख कुणाल कुमार यांनी सांगत प्रशासनाचा भार हलका केला होता़या तीन सदस्यीय समितीत केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव कुणालकुमार, नागपूर एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ़ अरविंद कुशवाह, सहाय्यक प्राध्यापक डॉ़ सितीकांता बॅनर्जी यांचा समावेश होता.केंद्रीय समिती औरंगाबादहून रविवारी सकाळी शहरात दाखल झाली. शहरातील कौतिक नगर, शिवाजीनगरात पाहणी केली़ कोविड रुग्णालयात बैठक घेऊन चर्चा केली़ आम्ही चुका काढायला आलो नसून तुमच्या मदतीसाठी आलो असल्याचे सहसचिव कृणाल कुमार यांनी सांगून प्रशासनाचा भार हलका केला होता़दोन सदस्यीय समितीच्या पाहणीनंतर आता त्रिसदस्यीय समितीने महिनाभरातनंतर शहरातील दोन प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी केली़ नियोजीत दौऱ्यापेक्षा पाऊण तास उशिरा समिती दाखल झाली़समितीने प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. सुरूवातीला अयोध्यानगर, कौतिक नगरमध्ये समिती ११.१५ वाजता दाखल झाली. आल्या आल्याच किती सर्व्हे झाला, किती रुग्ण आहे, याची माहिती कुणालकुमार यांनी माहिती विचारली.या परिसरात १६ जुलै, ३ व २३ जुलैला ४ असे ७ रुग्ण दोन कुटुंबात आढळून आले असून त्यांच्या संपकार्तील ५६ लोकांची चाचणी केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सोनल कुलकर्णी यांनी दिली. ३४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील १२ लोकांना अन्य व्याधी असल्याचे त्यांनी सांगितले, यावर तुम्ही सर्व्हेक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करा, १४ दिवसानंतरही या लोकांवर लक्ष असू द्या अशा सूचना समितीने केल्या.नागरिकांशी संवाद साधून अत्यावश्यक सेवा उपलब्ध होत आहेत का? अशी विचारणा कुणालकुमार यांनी केली. यावर एरिया बाहेरच गाडी येते तेथूनच आम्ही घेतो असे नागरिकांनी सांगितले.आयसीयू उघडलेसमिती येणार असल्याने नवीन आयसीयू अखेर आज उघडण्यात आला होता. या ठिकाणी चादरी लावण्याचे कामे केली जात होते.मनुष्यबळाचा मुद्दा केंद्राकडे मांडणारसमितीने कोविड रुग्णालयात १५ मिनिटे चर्चा करून समितीने पाहणी केली. यात ओपीडी सहा काही वॉर्ड बघितले. १५ मिनिटांच्या पाहणीनंतर समिती परतली. या चर्चेदरम्यान, विविध मुद्दयांवर चर्चा करून समितीने काही सूचनाही दिल्या़ शिवाय ज्या काही अडचणी असतील त्या आम्हाला सांगा आम्ही वरिष्ठ पातळीवर त्या मांडू, असे समितीने सांगितले त्यानुसार अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा समितीला सांगितला़कुणालकुमार यांनी रुग्णालयात मास्क बदलविलेकुणालकुमार यांनी सुरुवातीला कापडी मास्क परिधान केलेले होते. मात्र हे पाहणी दरम्यान लक्षात आल्यानंतर काही वेळ बाहेर थांबवून रुग्णालयातून न एन ९५ मास्क तातडीने मागविले. ओपीडीजवळ पाहणी करताना त्यांनी हे मास्क बद्दलविले व त्यानंतर कक्षात पाहणी केली.अहवाल पोहोचविण्याच्या प्रक्रियेवर कामनमुने घेण्यापासून ते अहवाल रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी लागणारा अवधी खूप असून या सर्व घटकांची बैठक घेऊन ही यंत्रणा अधिक सुरळीत केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिली. त्यावर बेड असिस्टंट या संकल्पनेवर समितीने समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव