शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा मार्ग अखेर मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:56 IST

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत सिग्नल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देरस्ता झाला अवर्गीकृत शिवजयंतीची भेटचाळीसगाववासीयांमध्ये समाधान

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत सिग्नल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिग्नल पॉर्इंट ते मालेगाव नाक्यापर्यंतचा रस्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने अवर्गीकृत करण्याला सोमवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीदिनी येथे पुतळ्याचे भूमिपूजन करण्याला वेग येणार असून, शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.शहराच्या मध्यवर्ती सिग्नल पॉर्इंट येथील त्रिकोणी जागेतील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व प्रस्तावित शिवसृष्टी उभारण्याचे नियोजन पालिकेने काही वर्षांपूर्वीच केले होते. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. शासनाने सोमवारी यातील रस्ता अवर्गीकृत करण्याचा निर्देश दिल्याने पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी विविध संघटनांनी आंदोलनेही सुरूच ठेवली होती. पुतळ्याजवळून जाणाऱ्या पालिका हद्दीतील सोलापूर-औरंगाबाद-धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११) अंतर्गत सिग्नल पॉर्इंट ते मालेगाव नाक्यापर्यंतचा रस्ता अवर्गीकृत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे टाऊन प्लॅनिंगच्या मान्यतेलाही आडकाठी येणार नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. गेल्या दीड वर्षांपासून आमदार उन्मेष पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले, असा दावा करण्यात आला आहे.सिग्नल पॉर्इंट परिसरातील सर्वे क्रमांक ५१ मधील त्रिकोणाकृती जागेतील ६८० चौ.मी. जागा याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महसूल विभाग व महसूल विभागाकडून पालिकेला हस्तांतरण करण्यात आली आहे. तसेच पालिकेमार्फतदेखील शिवपुतळ्याची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र याा जागेजवळून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शासनाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या १०० मीटर अंतरात कोणतेही स्मारक व बांधकाम करता येत नव्हते. ही जागा राष्ट्रीय महामार्गाकडून अवर्गीकृत व्हावी, अशी मागणी बºयाच वर्षांपासून होती. याबाबत पाठपुरावा झाल्याने शासनाने मान्यता दिली आहे.तीन कि.मी. रस्ता अवर्गीकृतचाळीसगाव पालिका हद्दीतील सोलापूर-औरंगाबाद-धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११) यातील साखळी क्रमांक ३९७/८०० ते ४०१/०० (३.२० कि.मी.) लांबीचा रस्ता अवर्गीकृत करण्यात आला आला आहे. याच भागात सिग्नल पॉर्इंट येथे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टीही उभारली जाणार आहे.२० रोजी भूमिपूजनगेल्या अनेक वर्षांपासून पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता. सोमवारी शासनाने परवानगी दिल्याने पुतळा उभारणीतील अडथळा दूर झाला आहे. २० रोजी नियोजित जागेवर भूमिपूजन करण्यात येईल.- आशालता चव्हाणनगराध्यक्षा, चाळीसगाव

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव