धुळे : शहरातील 57 टक्के भागाला पाणीपुरवठा करणा:या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सुकवद ते एमबीआर जलकुंभार्पयतच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गळत्या लागल्या आहेत़ विशेष म्हणजे वर्षभरात गळत्यांवर 18 लाख रुपयांचा खर्च झालेला असतानाही परिस्थिती बदललेली नाही़ गळतीतून वाहणा:या पाण्यामुळे अनेक ठिकाणी तापी पाणीपुरवठा योजनेचे काम 1991 ला सुरू करण्यात आले होत़े 29 जुलै 1994 पासून ही योजना कार्यान्वित झाली आह़े तेव्हापासून शहराच्या 57 टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आला आह़े मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आह़े आजच्या परिस्थितीत शहरात दररोज 5 कोटी 50 लाख लीटर पाणी दाखल होत़े पैकी एक कोटी 50 लाख लीटर पाणी केवळ गळती व नासाडीच्या माध्यमातून वाया जात आह़े तापी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढत आह़े गेल्या पाच वर्षात पाणी गळतीवर तब्बल एक कोटी 40 लाख रुपये खर्च झाले आहेत़ जलवाहिनीची लांबी 40 कि.मी. आह़े या वर्षी गळतीवर 18 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आह़े दरम्यान या जलवाहिनीचे कजर्ही अजून फिटले नसून ते माफ करवून घेण्यासाठी आयुक्तांचे सर्वतोपरी प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहेत़ तर दुसरीकडे या योजनेमुळे होत असलेली पाण्याची नासाडी व खर्च लक्षात घेऊन अमृत योजनेंतर्गत अक्कलपाडा ते नकाणे तलावार्पयत गुरुत्वाकर्षण जलवाहिनीसही प्राधान्य मनपा प्रशासनाने दिले आह़े त्यामुळे या जलवाहिनीचा वापर बंद केला जाणार आह़े परंतु तोर्पयत तरी उपाय करणे आवश्यक आह़े
गळतीतून साकारले ‘जलयुक्त शिवार’!
By admin | Updated: December 29, 2015 00:21 IST