गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून, हेच खड्डे वाहतुकीलाही अडचणीचे ठरत आहेत. गेल्या पंधरवड्यापासून बोदवडवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून ओडीएच्या पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही पाईपलाइन टाकण्यासाठी शहरात मलकापूर रस्त्यावरील चौफुलीवर मोठा खड्डा गत १५ दिवसांपासून खोदून ठेवला. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळही मोठाच खड्डा खोदून आठ दिवस उलटले आहेत.या खड्ड्यापासून बचाव व्हावा तसेच नागरिकांना खड्ड्याची माहिती व्हावी असे फलक अथवा बॅरिकेटिंग अद्याप लावण्यात आलेले नाही. तसेच हे खड्डे अद्यापही न बुजल्याने रात्री बेरात्री अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. संबंधित ठेकेदाराला नगरपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस देवून हे खड्डे बुजण्यास सूचना द्यावी अन्यथा काही अपघात झाल्यास या प्रकाराला नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. हेच खड्डे वाहतुकीलाही अडचणीचे ठरत आहेत.अशा परिस्थितीत खोदलेले हे खड्डे तातडीने बुजावेत, अशी मागणी त्रस्त नागरिक आणि वाहनधारकांनी केली आहे.
पाणीयोजनेचे खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 15:36 IST
गोपाळ व्यास बोदवड , जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून, हेच खड्डे वाहतुकीलाही ...
पाणीयोजनेचे खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण
ठळक मुद्देवाहतुकीलाही ठरताहेत अडथळेनागरिक त्रस्ततातडीने दखल घेण्याची बोदवडवासीयांची अपेक्षा