शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव शहरात ९ ते १० दिवसाआड होतोय पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 19:08 IST

भडगाव पालिका हद्दीत ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणारा कच्चा बंधाराही कोरडापाणीटंचाईमुळे नागरिकांचे हालपावसाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : पालिका हद्दीत ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.भडगाव शहरासाठी गिरणा नदीवर कच्चा बंधारा बांधण्यात आला आहे. तो सद्य:स्थितीत कोरडा पडला आहे. याशिवाय गिरणा नदीवरील भडगाव शहरासाठी तयार केलेल्या विहिरीही आज खाली आहेत. परिणामी पाणीपुरवठ्याची अडचण वाढली आहे.भडगाव शहरात भर उन्हाळ्यात गिरणेला पाणी असल्याने नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र पाहिजे तसा पाऊस न झाल्याने टंचाईत वाढ होत जाऊन येथील पाणीपुरवठा आता दहा दिवसाआड केला जात आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे सावट हे नागरिकांच्या लक्षात येत नसल्याने, पालिकेविरोधात त्यांच्या संतापात वाढ होत आहे.पिण्याचे पाणी नसल्याने व पावसाचे पाणी पडत असल्यामुळे शेतातील विहिरीचे पाणी गढूळ व पिण्यास अयोग्य झाले आहे, तर शहरातील अनेक सार्वजनिक हातपंपही बंदच आहेत. शिवाय पिण्यास योग्य पाणी शहरात कुठेही उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे टँकरचे प्रति टँकर मागे १०० रुपये महागले आहे, तर जारच्या पाण्याला जास्त मागणी आल्याने कंपन्या कमी व मागणी जास्त होत आहे. परिणामी मागणी करूनही जारचे पाणी विकत मिळणे कठीण होत आहे. एकंदरीतच, येन दुष्काळात भडगाव पालिका पाणीपुरवठा करण्यात यशस्वी ठरली होती. मात्र पावसाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे कठीण होत आहे.याबाबत नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणी पातळी खोल गेली असून, विहिरीचे काम सुरू आहे. आडवे बोर करत आहोत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातBhadgaon भडगाव