जामनेर : तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत रस्त्यावर पाण्याच्या टँकरखाली दबून मजुराचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बळीराम कच्छव रा. मोयगाव असे मयताचे नाव आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. तालुक्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून जीव धोक्यात घालून तालुकावासीयांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
पाणी टंचाईचा बळी, जामनेर तालुक्यात पाण्याच्या टँकरखाली दबून मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:51 IST