शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भडगावात पाणी टंचाईचे चटके

By admin | Updated: April 22, 2017 15:37 IST

35 हजारावर लोकसंख्या असलेल्या भडगावात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे

आठ दिवसाआड नळांना पाणी : नागरिकांची प्रचंड गैरसोयभडगाव, जि. जळगाव, दि. 22 -  तापमान वाढल्याने सर्वत्र  पाणी टंचाईचे चटके  बसण्यास सुरुवात झाली आहे.  35 हजारावर लोकसंख्या असलेल्या भडगावात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेतर्फे शहरात कॉलनी भागात 8-9 दिवसाआड तर पेठ व यशवंतनगरासह काही भागात 3-4 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, गिरणा नदीच्या आवर्तनापूर्वी कच्च्या बंधारा दुरुस्तीचे काम सुरु आहे.  बंधारा दुरुस्ती अभावी गिरणेचे पाणी वाहून गेले यंदा  गिरणा धरण पाण्याने चांगले भरले होते. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने गिरणा नदीवरील कच्चा बंधारा फुटला होता. पावसाळ्यानंतर मागणी होवूनही न.पा.ने हा बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. यंदा  गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन वेळोवेळी मिळाले मात्र दुरुस्तीअभावी पाणी न अडवल्यामुळे गिरणेवरील कच्चा बंधा:यात पाणी वाहून गेले. हा बंधारा न.पा.तर्फे पूर्वीच दुरुस्त झाला   असता तर आज पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नसते असे नागरिकांचे म्हणणे आहे.पाईपलाईनसाठी  1 कोटी 14 लाख निधी मंजूरनवीन कॉलनी व यशवंतनगरातील नवीन जलकुंभात पाणी येण्यासाठी 1 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर  झाला आहे. हा विषय 7 एप्रिल 2017 च्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.गिरणा नदीपात्रातील नवीन पाणीपुरवठा विहिरीपासून तर यशवंतनगर नवीन जलकुंभार्पयत नवीन लोखंडी पाईप टाकले जाणार आहेत. जलकुंभापासून पाचोरा रस्त्यालगत कॉलनी भाग व बाळद रस्त्यालगत पाईपलाईनच्या वाहिन्यांनी पाण्याचे वितरण केले जाणार आहे. या कामाचे अंदाजपत्रक तयार करुन हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे, अशी माहिती पालिका लिपिक नितीन पाटील यांनी दिली.  

नवीन जलकुंभार्पयत पाईपलाईनसाठी 1 कोटी 13 लाखाचा निधी मंजूर आहे. तसेच गिरणा नदीवरील कच्च्या बंधा:याचे काम सुरू असून गिरणेच्या आवर्तनापूर्वीच काम पूर्ण होईल,  याकामी न.पा. निधीतून साडेनऊ लाख खर्च अपेक्षित आहे. शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे नियोजन आहे. - बबन तडवी, मुख्याधिकारीशहर व कॉलनी भागात 8-9 दिवसाआड पाणीपुरवठा होतो तर पेठ- यशवंतनगरात सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कच्च्या बंधारा दुरुस्तीचे काम सुरू  आहे. तसेच  गिरणेवरील पक्क्या बंधा:याचा पाठपुरावा व प्रक्रिया सुरु आहे. -श्यामकांत भोसले, नगराध्यक्ष