शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आनंदनगर तांड्याला १५ वर्षापासून पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:04 IST

दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देआनंदनगर तांड्याला दुष्काळाची झळ कायमलोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराअधिग्रहीत विहिरीचे पाणी आटले

निपाणे, ता.एरंडोल : दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाई आणि रोजगाराचे साधन नसल्याने अर्धे गाव स्थलांतरीत झाल्याची भीषण स्थिती आहे.आनंदनगर तांडा हे आदिवासी बांधवांचे गाव आहे. गावातील १३० कुटुंबाची ८८९ लोकसंख्या आहे. गावावर दुष्काळाचे सावट असल्याने जवळपास ३०० ते ३५० नागरिक परराज्यात ऊस तोडण्यासाठी गेले आहेत. ३० कुटुंबांची घरे बंद आहेत.लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराआनंदनगर तांडा येथे सुमारे १५ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. सन २०१७ मध्ये मुख्यमंत्री पेय जल योजनेत आनंदनगर गावाचा समावेश केला आहे. मात्र आतापर्यंत ही योजना पुढे सरकलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात लोकप्रतिनिधींना गावबंदी करीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच वंदना राठोड, उपसरपंच ग्यारशीबाई राठोड, ग्रा.पं.सदस्य भास्कर राठोड, सामाजिक कार्यकर्ते भास्कर राठोड यांनी दिला आहे.निधीअभावी विकास कामे ठप्पगावातील पथदिव्याचे सिमेंट खांब व तार हे पूर्णपणे जीर्ण झाले आहे. काही खांब तुटलेले आहेत. भास्कर राठोड यांच्यासह काही ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत लेखी व तोंडी तक्रार दिली आहे. मात्र त्यानंतरही कामे झाली नाही. भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.अधिग्रहीत विहिरीचे पाणी आटलेसन १९९५ पूर्र्वी आनंदनगर तांडा हे निपाणे ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर आनंदनगर तांडा ही स्वतंत्र ग्राम पंचायत झाली. निपाणे वॉटर सप्लाय मार्फत तांड्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. मात्र निपाणे गावासाठी पाणी कमी पडु लागल्याने तांडाचे पाणी बंद करण्यात आले व १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत आनंदनगर गावाचा समावेश करण्यात आला. परंतु १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणी पट्टी महाग पडत असल्याने ही प्रादेशिक योजना बंद केली. त्यानंतर तांड्याला भीषण पाणी टंचाई जाणवू लागली. त्यानंतर माजी सरपंच विजय धनराज राठोड यांची विहीर अधिग्रहण केली. मात्र गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळीस्थिती असल्याने विहिरीला देखील पाणी नाही.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी