शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:59 IST

खरीप दुष्काळ अनुदानाचे ९९.६१ टक्के वाटप पूर्ण

जळगाव : जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके पूर्णपणे दुष्काळी तसेच उर्वरीत दोन तालुक्यांनाही पैसेवारी कमी आल्याने दुष्काळाचे निकष लागू झालेले असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील खरीपाचे नुकसान झालेल्या ५ लाख ८२ हजार १४६ शेतकऱ्यांना खरीप दुष्काळी अनुदानाचे ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपयांचे म्हणजेच ९९.६१ टक्के रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून १९३ गावांना सध्या १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार मीना हे बुधवार, १५ रोजी जिल्हा दौºयावर येत असून ते सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दालनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्केच पाऊस झाल्याने यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ पडला असून आहे. त्यापैकी जळगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, पारोळा, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर एरंडोल व धरणगाव हे तालुके मात्र केंद्र शासनाच्या निकषात न बसल्याने वगळण्यात आले. मात्र या दोन तालुक्यांमध्ये देखील पीक पैसेवारी ५० टक्क्यांच्या आतच आली आहे. मात्र खरीप दुष्काळ अनुदान मात्र १३ तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांनाच वाटप करण्यात आले आहे.५ लाख ८२ हजार शेतकºयांना दुष्काळ अनुदान वाटपजिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील १३४६ गावांमधील ५ लाख ८२ हजार १४६ शेतकºयांना खरीप दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून ४०४ कोटी ६१ लाख ४१ हजार २८० रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपये इतका निधी दुष्काळ अनुदान म्हणून वाटप करण्यात आला आहे. तर प्रशासकीय खर्चाचे ५९ लाख ९४ हजार ८०० रूपये वगळण्यात आले आहेत. तसेच १७ कोटी ६२ लाख ८७हजारांचा निधी आवश्यकता नसल्याने शासनाला परत करण्यात आला आहे. १३ पैकी भुसावळ व बोदवड तालुका वगळता उर्वरीत ११ तालुक्यांमध्ये १०० टक्के अनुदानाचे वाटप झाले असून भुसावळमध्ये ९५.१३ टक्के तर बोदवड तालुक्यात ९४.०१ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे.बोंडअळी अनुदान वितरणाची आकडेवारीच नाहीमागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील शेतकºयांना वाटपासाठी ४३९ कोटी ४० लाख ८० हजारांचे वितरण जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. मात्र तालुकास्तरावरून किती शेतकºयांना त्याचे वितरण झाले? याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. तहसीलदारांकडून ही माहिती मागवूनही तातडीने सादर करण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या कामाचे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे.२७१ गावांसाठी २७८ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. जोरदार पाऊस न झाल्याने धरण, बंधाºयांमध्ये ठणठणाट आहे. मोजक्या धरणांमध्येच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे १९३ गावांना १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. तर २७१ गावांसाठी २७८ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ५४ गावांसाठी ५१ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. तर ६१ गवांसाठी १११ नवीन विंधन विहिरी तर ४२ गावांना ५८ नवीन कपूनलिका घेण्यात आल्या आहेत. ४८ गावांमध्ये ४८ विहिरींचे खोलीकरण करण्यात आले आहे. तर २ गावांना २ नळपाणी योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव