शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नार-पार’चे पाणी गिरणा खोऱ्याला देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:49 IST

जळगाव : नार-पार खोºयातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात करण्यात आलेला करार रद्द करून या खोºयातील पाणी मोठ्या तुटीच्या गिरणा ...

जळगाव : नार-पार खोºयातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात करण्यात आलेला करार रद्द करून या खोºयातील पाणी मोठ्या तुटीच्या गिरणा खोºयाला देऊन खान्देशची तहान भागवावी, अशी मागणी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अ‍ॅड. विश्वासराव भोसले यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. नार-पार गिरणा नदीजोड योजना प्रकल्प राबविल्यास उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होण्यासही मदत होईल, असेही त्यांनी सुचविले आहे.नार-पार खोºयातील पाणी गिरणा खोºयात वळविण्यासंदर्भात शरद पवार यांनी ११ जानेवारी रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली होती. ही बाब उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी, जनतेसाठी सुखावणारी आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दोन दिवसीय जळगाव दौºयादरम्यान अ‍ॅड. विश्वासराव पाटील यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.नार-पार पश्चिम वाहिनी नदीतील पाणी पूर्व वाहिनी गिरणा खोºयात वळविल्यास उत्तर महाराष्ट्रातील जनतेची ४० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होईल.गिरणा लिंक प्रस्तावाची अंमलबजावणी करावीनाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नार-पार खोºयातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात १५ जानेवारी २०१५ रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पार-तापी-नर्मदा लिंक प्रस्तावास मान्यता देण्यात येऊन नार-पार खोºयातील ३२ टीएमसी पाणी गुजरातला साबरमतीमार्गे देण्याचा प्रस्ताव तयार झाला व करार होऊन तत्कालीन महाराष्ट्र शासनाने संमती दिली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेवर मोठा अन्याय झाला असल्याचे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी हे पाणी गुजरातला न देता गिरणा खोºयाला देण्यात यावे व राष्ट्रीय जलसंपत्ती नियमन प्राधीकरण, हैद्राबाद या संस्थेने ११ जानेवारी २०११ रोजी तयार केलेल्या नार-पार गिरणा लिंक प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला सूचना करावी, अशीही मागणी अ‍ॅड. भोसले यांनी केली आहे.

टॅग्स :riverनदीJalgaonजळगाव