शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

जळगाव जिल्ह्यात आग ओकणाऱ्या सूर्याचा पशुपक्षांवर कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:19 IST

खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा तर प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू

जळगाव : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांसह पशु व पक्षांना त्याचा त्रास होत आहे. तापमानवाढीमुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे ६८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. तर तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे वटवाघळांचा मृत्यू झाला. भुसावळ शहरातील कोळशाच्या वॅगनला व जनरेटरला अति उष्णतेमुळे आग लागल्याची घटना सोमवारी झाली.खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा मृत्यूपाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील तब्बल ६८ मेंढ्या अचानक मृत्यूमुखी पडल्या. यामुळे मेंढपाळ मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.रेल्वे यार्डातील दगडी कोळशाच्या वॅगनला आगरेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या दगडी कोळशाच्या वॅगनला अतिउष्णतेमुळे अचानक आग लागली. वॅगनमधून धूर येताच जवळ असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.आगीने उग्ररूप धारण करण्यापूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली व मॉर्डन रोड परिसरातील मुख्य पोस्ट आॅफिसमधील जनरेटरला उष्णतेमुळे आग लागली. नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.भुसावळात जनरेटरने घेतला पेटभुसावळ शहरात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. याच वेळी टपाल कार्यालयातील जनरेटर सुरू केले. तेव्हा अति उष्णतेमुळे याच जनरेटरने अचानक पेट घेतला. ही बाब टपाल कार्यालयाच्या आवारात असलेल्या नागरिकांनी आत जावून अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा कर्मचाºयांनी अग्निरोधक यंत्रणेच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यातच या कार्यालयाचे कर्मचारी अशोक अडकमोल (वय ५५) यांच्या पायाला इजा झाली. त्यात ते जखमी झाले. आग आटोक्यात आली असली तरी जनरेटरचे मात्र पूर्णपणे नुकसान झाले आहे.उत्तर भारताला जोडणाºया मध्यरेल्वेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराची आता हॉट सिटी म्हणून ओळख निर्माण केली आहे.दरम्यान, भुसावळातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयाने शहराच्या तापमानाचा पारा ४७.६ अंश असल्याची नोंद केली आहे. उच्चांकी तापमानामुळे आता शहरातील जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.दीपनगर औष्णिक केंद्रामुळे होणारे थर्मल पोल्यूशन, अविकसीत ग्रीन बेल्ट आदींमुळे शहरातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत भुसावळ शहराचे तापमान सरासरी दोन अंशांनी अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात यापूर्वी १ मे २००९ रोजी ४७.५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. या तापमानाचा रेकॉर्डदेखील आता तुटला आहे. उच्चांकी तापमानामुळे शहरात सकाळी ११ ते ५:३० वाजेपर्यंत रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती निर्माण होत असून, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.शहरात अजून दोन ते तीन दिवस उच्चांकी तापमान राहू शकेल, असा अंदाजही केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी वर्तवला आहे.असह्य तापमानामुळे प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू्रप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे शंभरहून अधिक वटवाघूळ मृत आढळून आले़ तीव्र तापमानामुळे होरपळून वटवाघळांचा मृत्यू झाल्याचा अंदाज तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी व्यक्त केला आहे़ प्रतापपूर येथील बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष असून येथे मोठ्या संख्येने वटवाघूळांचे वास्तव्य आहे़ वाढते तापमान व पाण्याअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे़ मृत वटवाघळांना आरोग्य विभागातील कर्मचाºयांकडून १० फूट खोल खड्डा करुन पुरण्यात आले़भुसावळच्या तापमानाचा पारा ४७.६ अंशांवरहॉट सिटी भुसावळने आता राज्यातील उच्चांकी तापमान असलेल्या अकोल्याचा रेकॉर्ड आता भुसावळने तोडला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी अर्थात ४७.६ अंशावर पोहोचले. शहरातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयात ही नोंद करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव