जळगाव : म्हसावद रेल्वे गेट ते गिरणा नदीवरील पुलापर्यंतचा रस्त्याची दुवरस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. म्हसावदला रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यात या रस्त्यावरून दररोज शेकडो ट्रक वाहतूक करतात. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चार फूट उंचीचे बंधारे टाकण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरचे पाणी बाहेर निघत नाही. पायी जाणाऱ्यांनादेखील या रस्त्यांचा वापर करता येत नाही. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करून द्यावा. तसेच त्यासाठी २२ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता गिरणा नदी पूल ते रेल्वे गेटदरम्यान रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.