शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:30 IST

रत्नापिंप्रीसह परिसर : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, सात दिवसाआड पाणीपुरवठा

पारोळा, जि.जळगाव : रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई पाहता आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. यामुळे महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वदूर भटकंती करताना दिसत आहेत, तर सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भोकरबारी धरणातून या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणातच जलसाठा नसल्याने परिसराला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावासाठी गृप ग्रामपंचायत आहे. पाणीपुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र धरणच कोरडेठाक आहे. साहजिकच या धरणावरून अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या जलपातळीतही कमालीची घट झाली आहे. यात रत्नापिंप्रीसह तीन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण झाले आहे.रत्नापिंप्री गृप ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरी, गावात दोन टाक्या तसेच नवीन योजनाही देण्यात आली आहे. परंतु पाणीटंचाईच्या गंभीर समस्येने मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावातील सार्वजनिक विहिरींचेही इतर वापरासाठी खोलीकरण करणे गरजेचे आहे. सध्या इतर वापराच्या पाण्यासाठी व्यवस्था करणेदेखील असफल होत आहे.रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा आता गावातीलच सार्वजनिक ठिकाणी दोन नळांव्दारे करण्यात आला आहे. मात्र येथून पिण्यापुरतेच पाणी उपलब्ध होत आहे. तथापि, याव्यतिरिक्त गुरेढोरे यांच्या पिण्यासाठी पाणी तसेच घरगुती इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी जोतो आपापल्या शेती परिसरात जाऊन पाण्यासाठी दाही दिशा भटकताना दिसत आहे. हेच पाणी बरेच ग्रामस्थ पिण्यासाठीही वापरत आहेत. या पाण्यात मात्र टी.सी.एल. वापरले जात नाही. यातूनच आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईParolaपारोळा