शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जामनेर तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायत सदस्य संशयास्पद स्थितीत बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:40 IST

वाकडी, ता.जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे (३७) हे १९ मार्चपासून संशयास्पद बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देभावाने व्यक्त केला घातपाताचा संशयवाकडी धरणाजवळ आढळली चप्पल, दुचाकी कागदपत्रेपोलिसात धावधमकी दिल्याचे निवेदनडॉग स्कॉडकडून शोधपोलिसांनी तीन संशयितांना घेतले ताब्यात

पहूर, ता जामनेर, जि.जळगाव : वाकडी, ता.जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे (३७) हे १९ मार्चपासून संशयास्पद बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, मंगळवारी सायंकाळी वाकडी धरणाजवळ त्यांची दुचाकी, चप्पल व कागदपत्रे आढळले. त्यामुळे माझ्या भावाचा घातपात झाल्याचा संशय असून, त्याचा लवकर शोध लावावा, असे विनोदच्या भावाने म्हटले आहे.विनोद चांदणे हे १९ रोजी सकाळी नऊला नेहमीप्रमाणे घरून दुचाकी घेऊन निघाले, मात्र घरी परतले नाही. सायंकाळी वाकडी धरणाजवळील कच्च्या रस्त्यावर दुचाकी,चप्पल व काही कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली आहे, असे वाकडी येथील रहिवासी अमरसिंग पाटील यांनी विनोदच्या घरी सांगितले. तेव्हा भाऊ विजय लक्ष्मण चांदणे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर साहित्य विनोदचेच आहे, याची खात्री पटली.पोलिसात धावदुचाकी, चप्पल व अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे ही विनोदचीच आहेत, असे विनोदचे भाऊ विजय लक्ष्मण चांदणे यांनी साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट यांना सांगितले. मंगळवारी रात्री बाराला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. भावाचा घातपात झाला असेल असा संशय आहे. त्यामुळे त्याचा शोध लवकर लावावा, असे विजय चांदणे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.डॉग स्कॉडकडून शोधबुधवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी श्वानपथक नेऊन बेपत्ता विनोदचा शोध घेण्यात आला आहे. श्वानाने साहित्य पडलेल्या जागेपर्यंत माग काढला. त्या जागेवरच श्वान घुटमळले. यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट उपस्थित होते.धमकी दिल्याचे निवेदनकाही दिवसांपूर्वी विनोद लक्ष्मण चांदणे याने पहूर पोलिसात आपल्या जीवितास धका असल्याचे निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे. पण साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांनी आपल्या नियुक्तीनंतर अशा आशयाचे निवेदन आले नाही, अशी माहिती शिरसाट यांनी ‘लोकमत’ला दिली.या घटनेसंदर्भात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.राजकीय वासवाकडीचे सरपंच, उपसरपंच व एक ग्रामपंचायत सदस्य यांनी निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. यासंदर्भात अशरफ हुसेन तडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये संबंधित सरपंच, उपसरपंच व एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्याचा आदेश पारित केल्यामुळे वाकडी ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.विनोद हा सुशिक्षित असल्याने शासनाकडून येणाºया निधीची माहिती ग्रामपंचायतीकडून जाणून घेत होता. विनोदचा हा वाढता हस्तक्षेप डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे त्याला बेपत्ता करून घातपात केला असावा, असा आरोप होत आहे. या घटनेमागे राजकीय वास असल्याचीही वाकडीसह परिसरात चर्चा आहे.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंJamnerजामनेर