शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाघूर धरण साठ्यात १० दिवसात ६ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:05 IST

तीन मोठ्या प्रकल्पात १५.१४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १५.१४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या १० दिवसात वाघूर धरणाच्या साठ्यात ५.८५ टक्कांनी वाढ झाली आहे. तर मंगरुळ व हिवरा हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे १३ मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी आहे.तीनही धरणांच्या साठ्यात वाढसलग पाऊस सुरू असल्याने वाघूर, गिरणा, हतनूर धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. १० दिवसांपूर्वी ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला आहे. अशाच प्रकारे गिरणा धरणात ६ जुलै रोजी ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचल आहे. हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणात सध्या १३.३३ टक्के साठा आहे. ६ जुलै रोजी हा साठा १८.४३ टक्के होता.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी इतका असून १६ जुलैअखेर या प्रकल्पांमध्ये ४२८.६३ दलघमी म्हणजेच १५.१४ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.२० टीएमसी, गिरणा ७.०७ टीएमसी तर वाघूर धरणात ६.८६ टीएमसी उपयुक्त साठा आहे. वाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी १६ जुलैपर्यंत २२७ मिमी पाऊस पडला होता. तर यावर्षी १६ जुलैपर्यंत ३२१ मिमी पाऊस पडल्याने जळगाव शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी आहे. तर जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात ४५.३७ दलघमी म्हणजेच ६.९३ टीएमसी उपयुक्तसाठा आहे.जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा ७६.७३ टक्के, मंगरुळ १०० टक्के, सुकी ८६.०३ टक्के, मोर ६५.२१ टक्के, अग्नावती ५५.०५, हिवरा १०० टक्के, बहुळा - ३८.४९, तोंडापूर ६५.४९ टक्के, गूळ ६९.५२ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव