जळगाव : महापालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवार, २७ रोजी मतदान जनजागृती अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले.जळगाव रोटरी क्लब व जळगाव रोटरी वेस्टच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मंचावर महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, प्र-कुलगुरु पी.पी.माहुलीकर, रोटरी वेस्टच्या अध्यक्षा संगीता पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे उपस्थित होते.कुलगुरु म्हणाले की, मतदान केल्यानंतरच आपल्या शहराच्या विकासाबाबत किंवा मूलभूत सुविधांबाबत लोकप्रतिनिधींना बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. मी एकट्याने मतदान केले नाही तर काही फरक पडणार नाही ही वृत्ती सोडून मतदानाचा हक्क बजवावा व लोकशाहीचे संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी केले. चंद्रकांत डांगे यांनी कोणत्याही प्रलोभनाला अथवा अमिषाला बळी न पडता डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी विनोद ढगे व त्यांच्या सहकाºयांनी मतदान जनजागृतीसंदर्भात पथनाट्य सादर केले. यावेळी मतदान व व्यसनमुक्तीचीही शपथ घेण्यात आली. डॉ.नरसिंह परदेशी यांनी ही शपथ दिली. सुत्रसंचालन प्रा.दीपक सोनवणे यांनी केले.
लोकशाहीच्या संवर्धनासाठी मतदान करा : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 19:14 IST
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवार, २७ रोजी मतदान जनजागृती अभियान
लोकशाहीच्या संवर्धनासाठी मतदान करा : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील
ठळक मुद्देजळगावात रोटरी परिवारातर्फे मतदान जनजागृती कार्यक्रमप्रलोभनाला बळी न पडण्याचे केले मान्यवरांनी आवाहनमतदान जनजागृतीसंदर्भात पथनाट्य सादर