शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:58 IST

जळगाव : ‘दाही सरती वहन आली एकादशी मोठी, मंग सावरला रथ झाली गावांमधी दाटी’ या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई ...

जळगाव : ‘दाही सरती वहन आली एकादशी मोठी,मंग सावरला रथ झाली गावांमधी दाटी’या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील ओळीने सुवर्णनगरातील रथोत्सवाची महती सांगण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी कार्तिकी एकादशीनिमित्त रथ चौकातील श्रीराम मंदिरापासून उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात रथोत्सवाला जल्लोषात सुरु झाली.परिसराला आले यात्रेचे स्वरुपरथोत्सवाच्या पूर्व संध्येला गुरुवारी सुभाष चौकापासून ते थेट रथ चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला खेळणी, सौदर्य प्रसाधने, पूजेचे साहित्य, नारळ विक्रेते यासह विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल लागले होते. रथोत्वाच्या दिवशी तर सकाळी आठपासून दुकाने उघडली होती. रथोत्सवाचे दर्शंन घेतल्यानंतर खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सुभाष चौकापासून रस्त्यावर मोठी गर्दी होऊन, परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. रस्त्यावरुन चालण्यासाठी वाट राहिली नव्हती.ठिकठिकणी पोलिसांचा बंदोबस्तरथोत्सवात कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी दाणाबाजारातील हनुमान मंदिरापासून रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रथ चौकात तर पोलिसांचा मोठा फौजफाटासह दंगा नियंत्रक पथकही तैनात करण्यात आले होते. महिला पोलिसांचेही पथक तैनात होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सराफ गल्लीतून रथचौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली होती. दुपारनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.नागरिकांना मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहनरथोत्सवासाठी शहरासह बाहेरील गावांमधूनदेखील मोठ्या संख्येने नागरिक दर्शनासाठी आले होते. श्रीराम मंदिरातून रथोत्सव निघाल्यानंतर वहनाच्या मागे पोलिसांचा मोठा ताफा आणि पोलिसांचे वाहनदेखील होते. यावेळी वाहनांमधून पोलिसांतर्फे मंगळसूत्र, सोनसाखळ््यांवर लक्ष ठेवा, पर्स, मोबाईल, पाकीट सांभाळा, संशयित आढळल्यास पोलिसांना कळवा असे सांगत, चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत होते.

रामभक्तीचा दरवळला सुगंधझेंडूच्या फुलांनी रथ सजविण्यात आला होता़ यासह ३५ नारळांचे तोरण होते़ अश्वांची सजावट करण्यात आली होती़ अश्वांच्या पायाखाली स्प्रिंग होते़ अश्व हलत असल्याने तेच रथ ओढत आहेत असे वाटत होते़ रथासमोर मोठी रांगोळी साकारण्यात आली होती़ यासह श्रीराम मंदिरात सजावट करण्यात आली होती़ तोरण, लाईटींग व रस्ते दोनही बाजुंच्या रांगोळ्यानी सजले होते़ ठिकठिकाणी रथोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते़ संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते़पावसाच्या चिंतेमुळे साकडेगुरूवारी पाऊस पडल्याने भाविकांची तारांबळ उडाली होती़ शुक्रवारी रथोत्सवात पाऊस नको म्हणून श्रीराम मंदिराच्या कळसाजवळ नारळ ठेवून इंद्रदेवांना आवाहन करण्यात आले होते, आणि शुक्रवारी पाऊस आला नाही, हा चमत्कार असल्याचे मंगेश महाराज यांनी सांगितले़भाविकांची मांदीयाळीरथाच्या अगदी सुरूवातीला चिमुकल्यांचा छोटा रथ लक्ष वेधून घेत होता़ यानंतर कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे तैलचित्र असलेल्या ट्रॅक्टर, त्यानंतर टाळकरी, भजनी मंडळ व त्यानंतर संत मुक्ताबार्इंची पालखी होती़ ढोल ताशांच्या तालावर तरूणाई थिरकली होती़ यातच रथोत्सवानिमित्त आलेले बासरी विक्रेत्यांकडून सुमधूर सूरही कानावर पडत होता़ भजनी मंडळ भक्तित तल्लीन होऊन भजनं सादर करीत होते़ मेहरूण, देवपिंप्री, वाघोद आदी ठिकाणाहून भजनीमंडळ आलेले होते़ संपूर्ण परिसर राम नामाच्या जयघोषाने निनादला होता़मान्यवरांची उपस्थितीआमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सीमा भोळे, पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त डॉ़ उदय टेकाळे, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दादा नेवे, वसंत जोशी, शिवाजीराव भोईटे, अ‍ॅड. सुशील अत्रे, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव आदींसह हजारो भाविकांची उपस्थितीत होती़सुभाष चौकात उसळली गर्दीसुभाष चौकात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. ६ वाजेच्या सुमारास रथ या ठिकाणी पोहोचला. दीड ते दोन तास या ठिकाणी रथाला लागले. श्रीरामाचा जयघोषाने पूर्ण सुभाष चौक दणाणून गेला होता. विविध दुकानांवर रथोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत होत होते. प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी धडपड सुरु होती. दरम्यान, सुभाष चौकात रथाच्या अगदी सुरूवातीला थोरले वारकरी गृप जुने जळगावतर्फे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे विठ्ठल रूख्मीणींची मूर्ती सजविलेल्या ट्रॅक्टरवर ठेवण्यात आली होती़ याठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती़ त्यानंतर चिमुकल्यांचा छोटा रथात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती़ त्यामुळे हा रथ अधिकच लक्षवेधी ठरला़ त्यानंतर धर्म रक्षक गृप, जय भवानी गृप व श्री साईनाथ तरूण मित्र मंडळातर्फे ट्रॅक्टरवर हनुमानाच्या मोठ्या आकर्षक मूर्तीवर रोषणाई करण्यात आली होती़ ढोल ताशांच्या तालावर तरूणाईचा जल्लोष शिवाय फटाके फोडून सुभाष चौकात जणू दिवाळीच साजरी करण्यात आली.

भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे घडले दर्शन 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव