शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विद्युत परियोजनांसाठी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:50 IST

Medha Patkar : विद्युत योजनांसाठी पर्यावरणीय कायदे कमजोर करण्यात येत आहेत,  या कायद्याचे उल्लंघन सुरू आहे.  कच्छमध्ये पाणी पोहचले, पण ते शेतांमध्ये नाही तर अदाणी यांच्या चार बंदरांमध्ये पोहचले, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला आहे. 

- नरेंद्र पाटीलभुसावळ जि. जळगाव -  विद्युत योजनांसाठी पर्यावरणीय कायदे कमजोर करण्यात येत आहेत,  या कायद्याचे उल्लंघन सुरू आहे.  कच्छमध्ये पाणी पोहचले, पण ते शेतांमध्ये नाही तर अदाणी यांच्या चार बंदरांमध्ये पोहचले, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला आहे. 

‘नफरत छोडो.. भारत जोडो’ या आंदोलनाच्या प्रचारासाठी पाटकर ह्या बुधवारी भुसावळ येथे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील आरोप केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, एनएपीएमचे महाराष्ट्र संयोजक युवराज गटकळ, लवासा आंदोलन प्रमुख प्रसाद बागवे, शैला सावंत, निर्मला फालक,  संतोष सोनवणे, सीमा चौधरी उमेश राठोड, सुधाकर बडगुजर, कुंजबिहारी आदी उपस्थित होते.त्या म्हणाल्या की, आजही विद्युत प्रकल्पांची राख ही शेतामध्ये उडत आहे.  त्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढले आहे. यामुळे तापी अथवा नर्मदेचे पाणी हे पिण्यालायक राहिलेले नाही.

विद्युत योजनामुळे होणारे प्रदूषण, विस्थापन व विनाश याचा कोणी  अभ्यास करीत नाही.  पर्यावरण कायदे कमजोर केले जात आहेत. विद्युत योजनांना धडाधड मंजुरी दिली जात आहे. यास विरोध करु नका, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठकीत सांगितले आहे. जर पंतप्रधान असे सांगू लागले तर मग जनआंदोलनाशिवाय दुसऱ्या पर्याय काय आहे?  का असाही  प्रश्न  त्यांनी उपस्थित केला.

तापी नदी व वेल्हाळा येथील प्रदूषण हे  वीज प्रकल्पामुळे होत आहे. यासाठी काही पर्यावरणीय नियम  आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांची सुनावणी झाली पाहिजे, ती झालेली नसल्याचे पाटकर म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे समर्थन करीत त्या म्हणाल्या की, देशात गांधीजींच्या दांडीयात्रेपासून नर्मदा आंदोलनापर्यंत अनेक यात्रा निघाल्या आहेत.  या यात्रांमुळे काही सरकार पडले असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरJalgaonजळगाव