शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गाव वाघोड अन् रेल्वेस्थानक वाघोडा दोघांना सांधणारा मात्र रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 18:41 IST

रावेर तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्ग वा प्रमुख ग्रामीण मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात समाविष्ट करण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उभय रेल्वेस्थानक वाघोडवासीयांना रस्त्याअभावी कोसो दूर ठरत आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांची फरफट होत आहे.

ठळक मुद्देब्रिटिशांविरूद्ध चले जाव आंदोलनात गोºया अधिकाºयाचा बळी टिपण्यासाठी वाघोड गावाजवळ पंजाब मेल उलथून टाकणाºया उभय गावाच्या स्वातंत्र्यसेनानींच्या समरगाथेचे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ७१ वर्षात लोकप्रतिनिधींना व प्रशासनालाही विस्मरण झाल्याने हा रस्ता अडगळीत पडमध्य रेल्वे प्रशासन रेल्वे मार्गाला समांतर रस्ता निर्माण करण्यासाठी परवानगी देत नसल्याचा उगाचच बाऊ केला जात असला तरी माजी आमदार राजाराम महाजन यांनी जुने खानापूर रेल्वेगेट ते खानापूर रेल्वेपुलापर्यंत रेल्वे मार्गाला समांतर रस्ता तयार करण्यासाठी रेल्वे प्रशखानापूर व वाघोड शिवारातील बहुतांशी शेतकºयांचा पूर्वापार शेतीचा वहिवाट रस्ता त्याच गाडीरस्त्याने असल्याने शेतकरी बांधवांनीही या मागणीसाठी जोर लावून धरला आहे.

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्ग वा प्रमुख ग्रामीण मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात समाविष्ट करण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उभय रेल्वेस्थानक वाघोडवासीयांना रस्त्याअभावी कोसो दूर ठरत आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांची फरफट होत आहे.वाघोड गाव तालुक्यात स्वातंत्र्य संग्रामातील १९४२ च्या ब्रिटिश चले जाव आंदोलनात मैलाचा दगड म्हणून ठरले आहे. त्यांच्या या समरगाथेचे सदैव स्मरण राहावे म्हणून ब्रिटिशांनी खानापूर नजीकच्या रेल्वेस्थानकाला वाघोड गावाच्या नावाचा अपभ्रंश करून वाघोडा नाव दिल्याचा पूर्वातिहास आहे. वाघोड गावाच्या नावाचा अपभ्रंश करून वाघोडा नाव या मध्यरेल्वेच्या स्थानकाला दिले असले तरी, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ७१ वर्षे लोटली तरी सदरील रेल्वेस्थानक व वाघोड गावाला सांधणाºया रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाडी रस्त्याचा मात्र लोकप्रतिनिधींना व सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला आहे.वाघोड गावातील थोर स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाच्या चिरंतन स्मृतींसाठी ब्रिटिशांनी वाघोडा स्थानकाचे नामकरण केले. मात्र त्या स्मृतींना उजाळा देताना त्या स्थानकाला उभय ग्रामस्थांच्या संपर्कात आणण्यासाठी रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या पूर्वापार गाडी रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृती आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकारने स्वातंत्र्योत्तर काळातही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.वाघोड गावातील रेल्वे प्रवाशांना पूर्वापारप्रमाणे बैलगाडीतून रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाडी रस्त्याने ने-आण केली जात होती. मात्र आता फास्टफूडच्या जमान्यात कुणीही बैलगाडीत बसायला तयार नसल्याने थेट वाघोडा स्थानकावर कर्जोदमार्गे पाच कि.मी.च्या फेºयाने मोटारसायकल, रिक्षा वा मिळेल त्या वाहनाने जाण्याची तसदी घ्यावी लागत असल्याची शोकांतिका आहे. यामुळे हा फेरा वाचवण्यासाठी पूर्वापारप्रमाणे या खानापूर-वाघोड गाडी रस्त्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने कृती आराखड्यात समावेश करून अधिकृत प्रमुख जिल्हा मार्ग वा इतर जिल्हा मार्गाचा अधिकृत दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRaverरावेर