शिवणीत माजी सरपंचांच्या सुनांच्या हाती गावकारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 02:44 PM2021-02-19T14:44:03+5:302021-02-19T14:45:11+5:30

शिवणी येथे अडीच-अडीच वर्षाच्या झालेल्या समझोत्यानुसार फिप्टी-फिप्टी सत्ता राहणार आहे.

Village administration in the hands of the gold of the former Sarpanch in Shivani | शिवणीत माजी सरपंचांच्या सुनांच्या हाती गावकारभार

शिवणीत माजी सरपंचांच्या सुनांच्या हाती गावकारभार

Next
ठळक मुद्दे१५ वर्षाच्या विरोधानंतर या रणसंग्रामात राजपूत एकवटले अन् प्रथमच ’महिलाराज’ अडीच-अडीच वर्षाच्या झालेल्या समझोत्यानुसार फिप्टी-फिप्टी सत्ता राहणार
जय हिरेखेडगाव, ता.भडगाव : लाडकुबाईच्या पाऊलखुणा जपणा-या व मराठ्यांची येथे असलेली जुनी गढी म्हणून ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या शिवणी येथे दोन माजी सरपंचाच्या सुनबाईंना सरपंचपदाच्या खुर्चीचा मान मिळणार आहे. दि.१५ रोजी झालेल्या विशेष सभेत सुरेखाबाई शिवसिंग पाटील यांची तर उपसरपंचपदी जनाबाई रमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरेखाबाई या माजी गृहराज्यमंत्री सोनसिंग पाटील यांच्या पुतणी होत.येथे मागील १५ वर्ष व तीन पंचवार्षिक निवडणुकात राजपूत मंडळी आपापसात लढत होती. यावेळेस मात्र दोन माजी सरपंच खुमानसिंग पाटील व स्वरुपसिंग पाटील यांनी एकत्र येत परिवर्तन पँनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत नऊच्या नऊ जागांवर विजय मिळविला. १५ वर्ष सरपंच राहिलेले कै.भगवान सुपडू पाटील यांच्या सून व दोन वेळेस सरपंच राहिलेले स्वरुपसिंग शिवसिंग पाटील यांच्या आई सुरेखाबाई पाटील व पाच वेळेस ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या माजी सरपंच खुमानसिंग पाटील यांच्या सून करिश्मा सोमसिंग पाटील यांच्याकडे अडीच-अडीच वर्षाच्या झालेल्या समझोत्यानुसार फिप्टी-फिप्टी सत्ता राहणार आहे.विशेष सभेस सरपंच-उपसरपंच यांच्यासह करिश्मा सोमसिंग पाटील, अर्चना स्वर्णसिंग पाटील, प्रतिभा जयदीप पाटील, कोमल चंद्रमणी खैरे, कल्पना अप्पा खैरे, सुमनबाई सुरेश सोनवणे, रोहिदास रुपला चांभार हे ग्राम पंचायत सदस्य हजर होते.माजी सरपंच स्वरुपसिंग पाटील यांच्या घराण्यात तिघांना मीळालेले सरपंचपद, चर्मकार समाजाला बहुसंख्यीय दलित वस्तीत एससी प्रवर्गातून निवडून येण्याची अडचण असताना जनरल जागेवर रोहिदास चांभार यांना उमेदवारी देत त्यांचा झालेला विजय, नऊ ग्राम पंचायत सदस्यात सात महिला मिळून ‘महिला राज’ हे यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

Web Title: Village administration in the hands of the gold of the former Sarpanch in Shivani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.