शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नेरी येथील कार्यकर्त्याच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 15:16 IST

नेरी येथील कार्यकर्त्याच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जामनेर : ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी जामनेर येथून रवाना झालेल्या कार्यकर्त्यावर विरोधकांचे बारीक लक्ष असल्याने नेरी येथे एका कार्यकर्त्याची ग्रामस्थांनी चांगलीच धुलाई केली. या मारहाणीचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर फिरत होता. वाकोद येथे पैसे वाटणारे आल्याची माहिती मिळताच विरोधकांनी त्यांचा पाठलाग केल्याने पैसे वाटणारे पुढे पळत होते तर त्यांचे मागे विरोधक पळत होते, असे चित्र पाहावयास मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.               गेल्या काही वर्षात सर्वच निवडणुकीत पैसे वाटून मतदान करवून घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. निवडणूक सहकारी संस्थेची असो की नगरपालिका, ग्रामपंचायतीची पैसे वाटले जातात या अपेक्षेने मतदारदेखील एक दिवस आधी त्यांची वाट बघत असतात. स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या गावात जामनेर येथून मोठ्या प्रमाणात रसद पुरविली गेली. नेरी, पहूर, फत्तेपूर, वाकोद, तोंडापूर, गोद्री, मोयगाव बुद्रूक, लहासर येथे एका माता साठी ५०० ते ५००० रुपये वाटले गेल्याची दिवसभर चर्चा होत होती.यंदाच्या निवडणुकीत काहीही झाले तरी पैसे वाटू देणार नाही, असा निर्धार विरोधकांनी केल्याने सर्वच ठिकाणचे कार्यकर्ते जागरूकतेने पहारा देत होते. नेरी येथे पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्याला विरोधी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला व मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. प्रशासनातील निवडणूक विभागाने अशा कृत्यांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJamnerजामनेर