शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांना वसुंधरा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:14 IST

‘जळगाव फर्स्ट’चाही होणार गौरव. बाळकृष्ण देवरे, इम्रान तडवी व अजय पाटील यांना वसुंधरा मित्र

ठळक मुद्दे‘जळगाव फर्स्ट’चाही होणार गौरव.बाळकृष्ण देवरे, इम्रान तडवी व अजय पाटील यांना वसुंधरा मित्र निसर्ग पर्यटनासाठी देण्यात येणारा पुरस्कार आर्यन फार्मच्या संचालिका डॉ.रेखा महाजन यांना जाहीर

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ : वसुंधरा चित्रपट महोत्सवानिमित्ताने वसुंधरा सन्मान व वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांना वसुंधरा सन्मान तर निसर्ग संवर्धन चळवळीतील तरुण कार्यकर्ते बाळकृष्ण देवरे, इमरान तडवी आणि अजय पाटील यांना वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.शाहीर शिवाजीराव पाटील आपल्या कला पथकाच्या माध्यमातून ग्रामीण आणि नागरी भागात पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी गेल्या २५ वर्षापासून सातत्याने कार्य करीत आहेत. पर्यावरणाचा जागर हा त्यांचा पोवाडा अवघ्या महाराष्टÑात गाजला आहे. बाळकृष्ण देवरे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यामातून वनसंवर्धनासाठी व्यापक कार्य करीत आहे. विशेषत: सर्पमित्रांच्या चळवळीला त्यांनी रचनात्मक कार्य केले आहे. जळगाव शहरामध्ये वृक्षतोडीला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.इम्रान तडवी अग्नीपंख या संस्थेच्या माध्यमातून पक्षी संवर्धनाचे कार्य करीत आहेत ते खगोल अभ्यासकही आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे, शिबिरांचे आयोजन करणे आदी उपक्रमांचे ते गेल्या ८ वर्षापासून कार्य करीत आहे.अजय पाटील यांनी मु.जे.महाविद्यालयामध्ये नेचर क्लबची स्थापना केली. निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी तालुका स्तरावर विद्यार्थी युवकांची शृंखला उभी केली आहे. हे युवक ग्राम पातळीवर जाऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृतीचे कार्य करीत असतात. वसुंधरा महोत्सवात या व्यतिरिक्त दिले जाणारे ग्रीन टिचर्स पुरस्कार अनिल माळी, विशाल सोनकुळ, राहुल सोनवणे, सुनीता महाजन, प्रशांतराज तायडे यांना देण्यात येणार आहे.जळगाव फर्स्ट संस्थेलाही पुरस्कारजळगाव शहरात स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कार्य करणाºया जळगाव फर्स्ट या संस्थेला यावर्षीचा वसुंधरा संस्था पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निसर्ग पर्यटनासाठी देण्यात येणारा पुरस्कार आर्यन फार्मच्या संचालिका डॉ.रेखा महाजन यांना देण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोरा