तोंडापूर, ता.जामनेर : वाकोद येथील वसंत बाबूराव जोशी यांची अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्षपदी निवड झाली असून, जळगाव जिल्हाध्यक्षपदी पत्रकार विलास जोशी यांची तर राज्य संघटकपदी कुंभारी बुद्रूक येथील सरपंच सुरतसिंग जोशी यांची निवड करण्यात आली.नुकतीच अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकरणीच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष वामन मापारे उपाध्यक्ष नंदू मंडाळे, राज्य युवा अध्यक्ष गेंदालाल झुंगे, किशोर महाराज, शांतीलाल झुंगे, नारायण गदाई, समाधान गुरहाळकर, राज्य प्रसिद्धीप्रमुख सुरेश जोशी यांच्या हस्ते तसेच साकरू मोरे, पांडुरंग महाराज, गणेश महाराज, मोहन भवर, आत्माराम महाराज, मधुकर महाराज, अशोक जोशी यांच्या प्रमुख उपस्थितित नियुक्ति पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अखिल भटका जोशी समाज सेवासंघ महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्षपदी वसंत जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 18:53 IST
वाकोद येथील वसंत बाबूराव जोशी यांची अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्षपदी निवड झाली
अखिल भटका जोशी समाज सेवासंघ महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्षपदी वसंत जोशी
ठळक मुद्देराज्य कार्यकारणीच्या जिल्हाध्यक्षपदी विलास जोशीराज्य संघटकपदी सुरतसिंग जोशी यांची निवड