शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात मंगळवारपर्यंत वरुणराजाचा रुसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:54 IST

मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठळक मुद्देकुलाबा वेधशाळेचा अंदाजमान्सूनचा प्रवाह उत्तरेकडे सरकलातुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता

सचिन देव ।जळगाव : मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.गेल्या आठवड्यापासून मान्सून वाºयांचा प्रवाह उत्तर भारताकडे सरकला असल्याने, उत्तरप्रदेश, पंजाब, हरीयाणा, बिहार, हिमाचल प्रदेशचा काही भाग या ठिकाणी वादळी वाºयासह पाऊस सुरु आहे. या मान्सून वाºयांचा प्रवाह महाराष्ट्राकडे परतण्यासाठी अनुकूल वातावरण नाही.तसेच मान्सूनसाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण व्हायला, किमान आठवडा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा वेग मंदावला असून, फक्त कोकण किनारपट्टीवरच सध्या मध्यम स्वरुपाच्या हलक्या सरी अधून-मधून बरसत आहे.ढगाळ वातावरण कायम राहणारगेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारली असून, यापुढील आठवड्यातही खान्देशातील हवामान कोरडेच राहणार आहे. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरणदेखील कायम राहणार आहे. शक्य झाल्यास काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीदेखील बरसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.मान्सून वाºयांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे असल्याने, महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस लांबला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे,नंदुरबार या जिल्हयांमध्ये १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, भागात तुरळक हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस कुठेही पडणार नाही. १४ तारखेनंतर या भागात पावसाचा जोर वाढेल. -के. एस. होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव