न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : येथे सद्गुरू स्मृती महोत्सवात रविवारी मुलांसाठी चित्रकला, भावगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या मुलांना संतांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व आर्थिक बक्षीस वितरण करण्यात आले.या महोत्सवामध्ये अमेरिका, लंडन, कॅनडा, मुंबई, सुरत, अहमदाबाद इत्यादी देश-विदेशातील हरिभक्त येऊन महोत्सवामध्ये कथा, सेवा, भक्ती, संतांचे दर्शन, आशीर्वाद घेत आहेत.२४ ते ३० डिसेंबर दरम्यान होत असलेल्या या महोत्सवात आध्यात्मिक उपक्रमांसह विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबवण्यात येत आहेत. श्रीमद् भागवत कथा अंतर्गत भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र गाणे, सजीव देखाव्यांसह वक्ताश्री परमपूज्य सद्गुरू शास्त्री भक्तीप्रकाशदास यांनी कथेचे निरुपण केले.परमपूज्य धर्म धुरंधर १००८ आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज यांच्या धर्मपत्नी मातोश्री यांनी महिला भक्तांना आशीर्वाद व गुरुमंत्र प्रदान केला.दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धा तसेच भावगीत गायन स्पर्धा झाली.वक्ताश्रीं रुक्मिणी विवाहाची कथा सांगितली व कथेसह सजीव देखाव्यांमध्ये रुक्मिणी विवाह साजरा झाला.रात्री कार्यक्रमात श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था सावदा येथील मुलांनी सुंदरसा सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शित केला.याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष शास्त्री धर्मप्रसाददासजी, वक्ताश्री शास्त्री भक्तीप्रकाशदासजी, उपाध्यक्ष शास्त्री ज्ञानप्रकाशदासजी, पुराणी स्वामी ज्ञानजीवनदासजी (नाशिक), भक्तीप्रिय स्वामी (गढपूर), पुराणी स्वामी केशवप्रसाददासजी (वापी), पूज्य हरीजीवन स्वामी (गढपूर), चैतन्य स्वामी (मुंबई), हरिप्रसाद स्वामी (गढपूर), आनंद स्वामी (उज्जैन), खासदार रक्षा खडसे, धनंजय शिरीष चौधरी, म.सा.का. चेअरमन शरद महाजन, व्हाईस चेअरमन भागवत विश्वनाथ आदी मान्यवर उपस्थित होते.
न्हावी येथे सद्गुरू स्मृती महोत्सवात मुलांसाठी विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 21:12 IST