शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर लायन्स परिवारातर्फे सेवा सप्ताहात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 22:30 IST

लायन्स व लायनेस क्लबने सेवा सप्ताहानिमित्त विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले.

अमळनेर : येथील लायन्स व लायनेस क्लबने सेवा सप्ताहानिमित्त विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले. शहराबाहेरील श्री अंबरीश टेकडी येथे लायन्स व लायनेस क्लबच्या सदस्यांनी ५१ रोपट्यांचे रोपण केले.दरवर्षी लायन्स परिवारातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. ते यावर्षी उपप्राचार्य डॉ.प्रकाश शिरोडे, डी.आर.कन्याशाळेचे शिक्षक विनोद पाटील(कदम), शिरूड येथील जि.प.शाळेच्या शिक्षिका दर्शना बोरसे-चौधरी यांना समारंभपूर्वक देण्यात आला.प्रताप महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात कोरोना निर्मूलनासाठी ज्यांनी तन-मन-धन आणि अन्नदानाच्या माध्यमातून मोठे योगदान दिले अशा वैद्यकीय व अवैद्यकीय तथा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. तसेच वंचित सेवाभावी महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील,पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे, पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.संदीप घोरपडे, दर्शना बोरसे, माजी आमदार साहेबराव पाटील, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डिगंबर महाले, आमदार अनिल पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. लायन्स क्लबचे ट्रेझरर कुमारपाल कोठारी यांनी ध्वजवंदना म्हटली. जया जैन व रुपाली सिंघवी यांनी सूत्रसंचालन केले. लायन्स क्लबचे सेक्रेटरी विनोद अग्रवाल यांनी आभार मानले.शहरातील विविध पेट्रोल पंपांवर जाऊन लायन्स परिवाराने तेथील कर्मचारी व ग्राहकांची कोविड-१९ ची प्राथमिक तपासणी केली.सर्वांना सॅनिटायझर व मास्क दिले.डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.संदीप जोशी व मिलिंद नावसरीकर यांनी तपासणीसाठी सहकार्य केले.श्री मंगळ ग्रह मंदिर येथील कर्मचारी व परिसरातील नागरिकांची मधुमेहाबाबतची मोफत तपासणी करण्यात आली.या सर्व उपक्रमांना लायन्स लायनेस क्लबच्या सेक्रेटरी शारदा अग्रवाल, ट्रेझरर श्वेता कोठारी, जितेंद्र जैन, प्रदीप जैन, डॉ.रवींद्र कुळकर्णी व डॉ.रवींद्र जैन, योगेश मुंदडे, पंकज मुंदडे, प्रसन्ना पारख, अनिल रायसोनी, प्रशांत सिंघवी, दिलीप गांधी, राजू नांढा, शाम गोकलानी, नीरज अग्रवाल, अजय हिंदुजा, मनीष जोशी, येजदी भरुचा, हेमंत पवार, जयेश गुजराथी, महेंद्र पाटील, उदय शाह, जितेंद्र पारख, जितेंद्र कटारिया, प्रदीप अग्रवाल, सुरेश कुंदनानी, प्रा.नयना नवसारीकर, राजुल गांधी, डॉ.मंजुश्री जैन, सोनल जोशी, सोनाली मुंदडे, विपुला नांढा, जसमीन भरुचा,खुशाली पारख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर